शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

घोटाळ्याच्या चौकशीसाठी संसदीय समिती? विरोधी पक्ष मागणी करण्याच्या विचारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:24 IST

नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेमध्ये केलेल्या ११४०० कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी यूपीए सरकारवर टीका करणा-यांत प्रकाश जावडेकर व राजनाथ सिंह हे केंद्रीय मंत्रीही आघाडीवर आहेत. मात्र या घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्यात यावी, अशी मागणी करण्याच्या विचारात विरोधी पक्ष आहेत.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेमध्ये केलेल्या ११४०० कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी यूपीए सरकारवर टीका करणा-यांत प्रकाश जावडेकर व राजनाथ सिंह हे केंद्रीय मंत्रीही आघाडीवर आहेत. मात्र या घोटाळ्याच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्यात यावी, अशी मागणी करण्याच्या विचारात विरोधी पक्ष आहेत.अठरा वर्षांपूर्वी अटलबिहारी वाजपेयी सरकार असतानाच्या काळात घडलेल्या केतन पारेख याच्या घोटाळ््याची आठवण करुन देणारा हा घोटाळा आहे. शेअर मार्केटमध्ये उलाढाल करण्यासाठी केतनपारेखने याच प्रकारे एका बँकेच्या हमीपत्राच्या आधारे दुस-या बँकेतून पैसे वळते केले होते.असा घोटाळा करणारा केतन पारेख हा पहिला आर्थिक गुन्हेगार. हीच पद्धत नीरव मोदीने पीएनबीत करताना वापरली. केतन पारेख प्रकरणात माधवपुरा मर्कंटाइल बँक विशिष्ट रक्कम बँक आॅफ इंडियाला देऊ न शकल्याने हा आर्थिक घोटाळा उजेडात आला. शेअर बाजारही कोसळला होता. वाजपेयी सरकारला केतन पारेख प्रकरणाची चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमणे भाग पडले. ज्याच्यासोबत १९९०च्या दशकात केतन पारेखने काम केले, तो हर्षद मेहता हा शेअर घोटाळेबाजच होता. नीरव मोदीने एका बँकेच्या हमीपत्राद्वारे दुसºया बँकेतून पैसे वळते करण्याचेच तंत्र घोटाळ्यासाठी वापरले. पीएनबीने आता २० अधिकाºयांना निलंबित केले आहे.सीईओंचीही चौकशी?या घोटाळ््यात सहभागी असलेले पंजाब नॅशनल बँकेचे माजी डेप्युटी मॅनेजर गोकुळनाथ शेट्टी यांच्याही शोधात तपासयंत्रणा आहेत. शेट्टी यांची ३१ मार्च २०१० रोजी पीएनबीच्या ब्रीच कँडी शाखेत फॉरेन एक्स्चेंज डिपार्टमेंटमध्ये नियुक्ती झाली. ते २०१७ साली निवृत्त झाले. शेट्टी यांच्या बदलीचे आदेश २०१३ ते २०१७ या काळात तीनदा निघाले. मात्र प्रत्येक वेळी ते अंतर्गत कारणांमुळे रद्द करण्यात आले. त्यामुळे पीएनबीचे २०१० सालापासून ते आतापर्यंतचे सर्व व्यवस्थापकीय संचालक व सीईओ यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPunjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळा