शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

(संसद अधिवेशन/ दिल्ली प्रतिनिधीची बातमी) सरकारला केवळ जीएसटीची चिंता; काँग्रेसने ठेवल्या अटी

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

जयशंकर गुप्त/ नवी दिल्ली: सरकारने संसदेतील कोंडी सोडविण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली असली तरी सहभागासाठी काँग्रेसने ठेवलेल्या अटी पाहता ती निष्फळ ठरणार असल्याची अटकळबाजी सुरू झाली आहे. भूसंपादन विधेयकाचे भवितव्य आधीच अधांतरी असताना सरकारला वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) आणि अन्य दोन महत्त्वाची विधेयके पारित करवून घेण्यातच स्वारस्य उरले आहे. त्यामुळे उर्वरित सत्र जीएसटी विधेयकापुरते सिमित राहण्याची शक्यता आहे.

जयशंकर गुप्त/ नवी दिल्ली: सरकारने संसदेतील कोंडी सोडविण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली असली तरी सहभागासाठी काँग्रेसने ठेवलेल्या अटी पाहता ती निष्फळ ठरणार असल्याची अटकळबाजी सुरू झाली आहे. भूसंपादन विधेयकाचे भवितव्य आधीच अधांतरी असताना सरकारला वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) आणि अन्य दोन महत्त्वाची विधेयके पारित करवून घेण्यातच स्वारस्य उरले आहे. त्यामुळे उर्वरित सत्र जीएसटी विधेयकापुरते सिमित राहण्याची शक्यता आहे.
जीएसटी आणि अन्य दोन विधेयके पारित करण्यावर सरकार भर देणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजप मुख्यालयात बोलताना स्पष्ट केले. अधिवेशनाचा तिसरा आठवडाही गदारोळातच संपू शकतो. चौथ्या आणि अंतिम आठवड्यात सरकारला चार दिवसांत जीएसटी आणि काही महत्त्वाची विधेयके पारित करण्यात विरोधकांकडून सहकार्य लाभू शकते. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटी विधेयक पारित करणे किती आवश्यक आहे ते एका लेखातून स्पष्ट केले आहे. संसदेचे कामकाज बंद पाडण्यासाठीच काँग्रेसकडून गदारोळ सुरू आहे काय? हे विधेयक पारित करण्यात काँग्रेसकडून विरोध होणार की नाही, हे जाणून घेण्याची त्यांची इच्छा आहे. जीएसटी विधेयकाला लोकसभेने आधीच मंजुरी दिली आहे तर राज्यसभेच्या निवड समितीने आपला अहवाल सादर केला आहे. ५ वर्षे राज्यांच्या महसूलाची भरपाई करण्याची शिफारस या समितीने मान्य केली आहे.
---------------------
कोणते असणार डावपेच ?
जीएसटी विधेयकावर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली असली तरी बाहेरूनही काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांशी संपर्क चालविला आहे. काँग्रेसने दाद न दिल्यास अन्य महत्त्वपूर्ण मुद्यांवरील चर्चेच्या नावावर काँग्रेसला वेगळे पाडण्याची व्यूहरचना आखली जाऊ शकते. वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे येईपर्यंत संसद चालू न देण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेबाबत समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, बिजद, अण्णा द्रमुकसारखे पक्ष फारसे उत्साहित नाहीत. जनता परिवारातील पक्षांना जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी, गुरुदासपूरमधील हल्ल्यासारख्या मुद्यांवर चर्चा व्हावी असे वाटते. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अलीकडेच पुण्याच्या एफटीआयआयला भेट देऊन संपकरी विद्यार्थ्यांशी चर्चा केली आहे, हा मुद्दाही काँग्रेसकडून उपस्थित केला जाऊ शकतो.