शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

संसद कोंडी कायम राहण्याची चिन्हे!

By admin | Updated: August 2, 2015 00:15 IST

सोमवारी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी केंद्र सरकार आणि काँग्रेस दोघेही आपापल्या भूमिकेवर कायम असल्याने संसदेतील कोंडी लगेच फुटण्याची शक्यता कमी आहे.

नवी दिल्ली : सोमवारी होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीपूर्वी केंद्र सरकार आणि काँग्रेस दोघेही आपापल्या भूमिकेवर कायम असल्याने संसदेतील कोंडी लगेच फुटण्याची शक्यता कमी आहे.संसदेचे कामकाज सुरळीत सुरू करायचे असल्यास भाजपच्या तीन ज्येष्ठ नेत्यांविरुद्ध कारवाईचा मुद्दा बैठकीच्या अजेंड्यात असला पाहिजे, या मागणीवर काँग्रेसकडून शनिवारी जोर देण्यात आल्यावरही सरकार मात्र विरोधकांची ही मागणी मान्य करण्यास कुठल्याही परिस्थितीत तयार नाही. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सरकारच्या यापूर्वीच्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज निवेदन देण्यास तयार आहेत आणि राज्यांच्या मुद्यांवर संसदेत चर्चा होऊ शकत नाही, असे सांगितले. मुख्य विरोधी पक्षाने ललित मोदी प्रकरणात सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे; तसेच व्यापमं घोटाळ्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. संसदेतील कोंडी फोडण्यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले असल्याचा दावा भाजप सूत्रांनी केला. तत्पूर्वी सुषमा स्वराज, राजे व चौहान यांच्याबाबत सरकार काय कारवाई करते हा सर्वपक्षीय बैठकीत मुख्य मुद्दा असला पाहिजे,असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केले. भाजपकडूनच कामकाजात अडथळा - माकपादरम्यान, भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारतर्फेच संसदेच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने शनिवारी केला. सरकार आपल्या जबाबदारीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत आहे, असे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी सांगितले.(लोकमत न्यूज नेटवर्क)