शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

हार्ले-डेविडसन बाईकवरुन महिला खासदाराची संसदेत एंट्री

By admin | Updated: March 8, 2016 16:33 IST

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला खासदार रणजीत रंजन यांनी मंगळवारी थेट हार्ले-डेविडसन बाईकवरुन संसदेमध्ये एंट्री करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि.  ८ - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला खासदार रणजीत रंजन यांनी मंगळवारी थेट हार्ले-डेविडसन बाईकवरुन संसदेमध्ये एंट्री करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काँग्रेस पक्षाच्या रणजीत रंजन लोकसभेमध्ये बिहारच्या सूपॉल लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. ४२ वर्षीय रणजीत खास महिला दिनाच्या निमित्ताने आज संसदेमध्ये आपली हार्ले-डेविडसन बाईक घेऊन आल्या होत्या. 
 
निळया रंगाचा सूट, हेल्मेट आणि डोळयांना गॉगल लावलेल्या रणजीत रंजन यांनी हार्ले डेविडसनवरुन संसदेत एकदम झोकात प्रवेश केला. दोन मुलांची आई असणा-या रणजीत यांचे त्यांच्या हार्ले डेविडसन बाईकवर इतके प्रेम आहे की, त्या पती राजेश रंजन यांना बाईकला स्पर्शही करु देत नाहीत. राजेश रंजनही लोकसभेमध्ये खासदार आहेत. रणजीत यांनी स्वत:च्या कमाईमधून ती बाईक विकत घेतली आहे. 
 
हार्ले डेविडसन ही महागडी बाईक आहे. साडेचार लाखापासून या बाईकची किंमत सुरु होते. दुचाकी आणि सायकलवरुन आपण नियमित संसदेत येतो असे त्यांनी सांगितले. माझे आयुष्य असे आहे की, आतापर्यंत मी जे काही केले त्यावर माझ्या पालकांनी कधीही आक्षेप घेतला नाही असे रणजीत यांनी सांगितले. लोकसभेमध्ये महिला दिनाच्या चर्चेमध्येही त्या सहभागी झाल्या होत्या.