शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संसदेचे कामकाज दोन दिवस स्थगित

By admin | Updated: July 29, 2015 02:40 IST

देशाचे सच्चे सुपुत्र व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले.

नवी दिल्ली : देशाचे सच्चे सुपुत्र व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले.लोकसभेचे कामकाज सुरू होताच लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन व सदस्यांनी कलामांना श्रद्धांजली अर्पण केली. आज मी अत्यंत जड मनाने भारतरत्न आणि माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करते. ते देशाचे सच्चे सुपुत्र होते, असे महाजन म्हणाल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व पक्षांचे ज्येष्ठ नेते आणि बहुतांश सदस्य माजी राष्ट्रपतींना श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित होते. राज्यसभेचे सभापती हामीद अन्सारी व सदस्यांनी कलामांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर दोन्ही सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. शिवाय संसद सदस्यांना कलामांच्या अंत्यसंस्कारात सामील होता यावे यासाठी बुधवारसाठीही (२९ जुलै) संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.कॅबिनेट, निवडणूक आयोगाचीही श्रद्धांजली...केंद्रीय मंत्रिमंडळानेही मंगळवारी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. कलाम यांच्या निधनाने देशाने एक प्रभावी वैज्ञानिक, सच्चा देशभक्त आणि एक महान कर्मयोगी गमावला, अशा आशयाचा ठराव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारित करण्यात आला.निवडणूक आयोगानेही एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली. आयोगाने २०१० मध्ये मतदार जनजागृती कार्यक्रम राबविला होता. कलाम यांनी यात सहभाग नोंदवला होता. स्वतंत्र व निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेतील व्यापक सहभागिता आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रांचा वापर याचा त्यांनी कायम पुरस्कार केला, असे आयोगाने मंगळवारी जारी निवेदनात म्हटले आहे.