शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तंदूर प्रकरणात शर्मा याला पॅरोल

By admin | Updated: September 16, 2015 01:53 IST

खळबळजनक तंदूर हत्याकांडातील आरोपी युवक काँग्रेसचा माजी नेता सुशील शर्मा याला २० वर्षे कारागृहात घालविल्यानंतर मंगळवारी पॅरोलवर मुक्त करण्याचा आदेश दिल्ली

नवी दिल्ली : खळबळजनक तंदूर हत्याकांडातील आरोपी युवक काँग्रेसचा माजी नेता सुशील शर्मा याला २० वर्षे कारागृहात घालविल्यानंतर मंगळवारी पॅरोलवर मुक्त करण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. शर्मा याने पत्नी नैना साहनी हिची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह तंदूरच्या भट्टीत जाळला होता. क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या या हत्याकांडाने देश ढवळून निघाला होता.शर्माने शिक्षामाफी आणि मुदतपूर्व सुटकेसाठी अर्ज सादर केला असून सक्षम प्राधिकरणाकडून त्यावर विचार होईपर्यंत त्याला पॅरोलवर कारागृहाबाहेर राहता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. आरोपीने २० वर्षे कारागृहात काढली असल्यामुळे संचित रजेवर (पॅरोल)मुक्त होण्याचा त्याला अधिकार आहे, असे न्या. सिद्धार्थ मृदुल यांनी स्पष्ट केले. त्यांनी शर्माला पॅरोलवर मुक्त करताना कोणत्याही अटी घातल्या नाहीत.कनिष्ठ न्यायालयाने २००३ मध्ये शर्माला फाशीची शिक्षा ठोठावली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने २००७ मध्ये हा निर्णय योग्य ठरविला होता. सर्वोच्च न्यायालयाने ८ आॅक्टोबर २०१३ रोजी ही शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित केली होती. हे हत्याकांड म्हणजे पत्नी नैना साहनी हिच्यासोबतचे संबंध ताणले गेल्याची परिणती होती. आरोपी शर्मा याने दहा वर्षे फाशी सेलमध्ये काढले असून तो सराईत गुन्हेगार नाही, असे सांगतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्याला ठोठावण्यात आलेल्या जन्मठेपेपैकी उर्वरित वर्षाची शिक्षा माफ केली जाऊ शकते, असेही सूचित केले होते. तपास प्रक्रियेत तिचा जाळलेला मृतदेह दाखविण्यात आला होता तेव्हा तो रडला होता, याचा अर्थ त्याला मुळीच पश्चात्ताप झाला नाही, असे मानता येत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)