शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

प. बंगालमध्ये डाव्यांच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न

By admin | Updated: May 23, 2016 04:07 IST

पश्चिम बंगाल विधानसभेसाठी अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा दारुण पराभव झाला. पक्षाने निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी युती केली होती.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेसाठी अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्या पक्षांचा दारुण पराभव झाला. पक्षाने निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी युती केली होती. ती मतदारांनी नाकारली. आता यापुढेही मतांची फूट टाळण्यास पक्षाला अपयश आल्यास राज्यात पक्षाच्या अस्तित्वाबद्दल गंभीर प्रश्न उभे राहतील, अशी कबुली माकपच्या एका पॉलिट ब्युरो सदस्याने दिली आहे.एकेकाळी पश्चिम बंगाल हा डाव्या पक्षांचा गट मानला जात होता. या राज्याला लालगढ म्हणूनही ओळखले जात होते; मात्र विधानसभा निवडणुकीत या पक्षाची सदस्यसंख्या ६२वरून (२०११) एकदम ३२वर आली. काँग्रेस हा डाव्या आघाडीचा राजकीय शत्रू समजला जातो; पण आपले वैचारिक मतभेद दूर करीत पक्षाने निवडणुकीत या राजकीय शत्रूशी आघाडी केली. तसे करूनही डाव्या आघाडीला आपल्या आणखी ३० जागा गमवाव्या लागल्या.चूक कोठे झाली शोधावे लागेलयापुढे आम्ही आमची मते आणि जनाधार गमावण्याची प्रक्रिया थांबली नाही, तर आमच्या पक्षाच्या अस्तित्वावरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. आम्ही केवळ जनतेच्या मनात काय चालले आहे, ते समजू शकलो नाही, तर गेल्या पाच वर्षांत गमावलेली शक्तीही पुन्हा प्राप्त करू शकलो नाही. काँग्रेससोबत केलेली युती जनतेला आवडली नाही. तृणमूल विरोधी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आम्ही काँग्रेसशी युती केली; पण ती आमच्या विरोधात गेली. लोकांना ही युती पसंत पडली नाही. बेरोजगारी, भ्रष्टाचार, औद्योगिकीकरण आदी मुद्दे उपस्थित करूनही जनतेने ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेस यांना मते दिली हे आम्ही नाकारू शकत नाही. आमची नेमकी चूक कोठे झाली हे शोधावे लागेल. आमची निवडणुकीतील दिशा बरोबर होती की नाही, की जनतेपासून आम्ही दुरावलो आहोत, हे पाहावे लागेल.- माजी खासदार हन्नान मुल्ला, माकप पॉलिट ब्युरो सदस्य (वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत )डाव्या पक्षांच्या मतदारांची काँग्रेसला मते पडली; पण काँग्रेसची मते डाव्या पक्षांना पडली नाहीत, असे दिसते. - मोहम्मद सलीम, माकपा पॉलिट ब्युरो सदस्य