शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 22:16 IST

अहमदाबाद, दि. 25 -  देशातील पाच राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरात, राजस्थान, आसाम, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गुजरात राज्यातील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. तसेच, पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे आश्वासन दिले. ...

अहमदाबाद, दि. 25 -  देशातील पाच राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गुजरात, राजस्थान, आसाम, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी गुजरात राज्यातील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली. तसेच, पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री विजय रुपानी उपस्थित होते.

आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये पोहचले. त्यानंतर त्यांनी राज्यातील पूरग्रस्त भागाई हवाई पाहणी करुन पूरस्थितीचा आढावा घेतला. तसेच, पुरात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे सांगितले. याचबरोबर, केंद्र सरकारकडून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला 500 कोटी रुपये देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 

उत्तर गुजरातमधील सौराष्ट्र , बनासकांठा आणि साबरकांठा तसंच दक्षिण गुजरातमधील वलसाडला पूराचा सर्वाधिक फटका बसला आहे. आतापर्यंत 7 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नदी, नाले व रस्ते पाण्याखाली गेल्याने गुजरातमधील रस्ते व रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसात पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने 900 जनावरांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कर आणि हवाईदलाला पाचारण करण्यात आले आहे. मोर्बी, राजकोट, सुरेंद्रनगर, बनासकांठा आणि अहमदाबाद जिल्हे पाण्याखाली गेल्याने नागरिकांनी सरकारी इमारती व शाळांमध्ये आश्रय घेतला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीजप्रवाह ठप्प झाले आहेत. 19 राज्यमार्ग आणि 102 अंतर्गत रस्ते बंद करण्यात आले आहेत.

दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही  नुकतीच सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली व पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. हेलिकॉप्टरच्या साहाय्याने पूरग्रस्त भागात अन्नाची पाकिटे व पाणी पाठवण्यात आले आहेत. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत शाळा कॉलेजस बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत.