पानसरे मुख्यमंत्री
By admin | Updated: February 21, 2015 00:49 IST
पानसरेंच्या हल्लेखोरांना हुडकून काढू : मुख्यमंत्री
पानसरे मुख्यमंत्री
पानसरेंच्या हल्लेखोरांना हुडकून काढू : मुख्यमंत्रीनागपूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना लवकरात लवकर शोधून काढण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत. हल्लेखोरांच्या तपासासाठी २० पथके तैनात करण्यात आली असून लवकरच त्यांना हुडकून काढू असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपराजधानीत केले. शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०१ व्या दीक्षांत समारंभानंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते़ गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर सोमवारी सकाळी कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानाजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यामध्ये गोविंद पानसरे यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. यासंदर्भात बोलताना आपण गोविंद पानसरे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या संपर्कात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले़ या प्रकरणात सरकार गंभीर असून तपासाची कारवाई योग्य दिशेने सुरू आहे़ हल्लाप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. हल्लेखोरांचे रेखाचित्र तयार करण्यात आले असून त्या आधारावर तपास पुढे सरकत आहे असेदेखील ते म्हणाले.