शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पंकजांना तुर्तास अभय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2015 00:39 IST

मध्यप्रदेशातील ‘व्यापम’ आणि राजस्थानच्या मोदी प्रकरणाने महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातील २०६ कोटींचे खरेदी प्रकरण दोन आठवडे मागे पडले आहे

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीमध्यप्रदेशातील ‘व्यापम’ आणि राजस्थानच्या मोदी प्रकरणाने महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातील २०६ कोटींचे खरेदी प्रकरण दोन आठवडे मागे पडले आहे. संसद अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यात यावर चर्चा होईल. खरेदीत केंद्राचाही पैसा असल्याने कितीही दबाव आला तरी कारवाईचे कोणतेही आश्वासन केंद्र देणार नसल्याचे सांगण्यात आले. पंतप्रधानांनी पंकजा मुंडेंना अभय दिल्याचा अर्थ यातून काढला जातो.खरेदी प्रकरणावरून गोंधळ उडताच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय माकन यांनी चौकशीची मागणी केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. मात्र आता संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यावर मुंडेंच्या खरेदी प्रकरणापेक्षा व्यापमं व ललितगेट प्रकरण मोठे असल्याने खरेदी प्रकरणावर दोन आठवड्यांनी लक्ष घालू असे खासदार राजीव सातव यांनी लोकमतला सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीस यांना समन्वयक नेमून काँग्रेस राजवटीतील घोटाळे शोधण्याचे काम नेमून दिले. त्यांनी मंगळवारी दुपारी भाजपाच्या सासंदीय कार्यालयात एक अहवाल दिला. केरळमधील सौर ऊर्जा व बार अपहार, आसाममधील पाणी व्यवस्थापनातील घोटाळे, उत्तराखंडमधील पूर व्यवस्थापनातील घोळ, कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या व निधी वाटपातील गैरव्यवहार, प. बंगालमधील मानवी तस्करी, हिमाचल प्रदेशातील पोलाद घोटाळा, बंगालमधील चिटफंड आणि गोव्यातील लुईस बर्जर कंपनीकडून गोव्यातील मंत्र्यांना देण्यात आलेल्या ६ कोटी रु पयांचे कथित लाचप्रकरणांचा वापर सरकार अस्त्र म्हणून करणार आहे.