शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

पनीरसेल्वम यांना एआयएडीएमकेच्या आणखी 11 आमदारांचा पाठिंबा

By admin | Updated: February 12, 2017 16:30 IST

तामिळनाडूच्या सत्तासंघर्षात दिवसेंदिवस पनीरसेल्वम यांची बाजू भक्कम होताना दिसत आहे.

ऑनलाइन लोकमतचेन्नई, दि. 12 - तामिळनाडूच्या सत्तासंघर्षात दिवसेंदिवस पनीरसेल्वम यांची बाजू भक्कम होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी शशिकला यांना पाठिंबा देणारे बरेचशे आमदार आणि खासदार पनीरसेल्वम यांच्या गोटात येऊन त्यांना पाठिंबा जाहीर करत आहेत. त्यामुळे शशिकला काहीशा अस्वस्थ आहेत. आता शशिकलांच्या तंबूतील जवळपास 11 आमदार आणि आणखी तीन खासदार पनीरसेल्वम यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. जयसिंग त्यागराज नट्टेरजी, सेनगुट्टूवन आणि आर. पी. मरुथराजा या खासदारांनी पनीरसेल्वम यांना पाठिंबा दिला असून, कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावाखातरच हा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पनीरसेल्वम यांच्या बाजूने सध्या 18 आमदार आणि 10 खासदार आहेत. त्यामुळे शशिकला यांना सरकार स्थापन करता येणार नाही.तामिळनाडू राज्याचे शिक्षणमंत्री के. पंडिराजन यांनी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यापूर्वीच एआयएडीएमकेचे चार खासदार पी. आर. सुंदरम, के. अशोक कुमार, व्ही सत्यबामा आणि वनरोजा यांनी पनीरसेल्वम यांना समर्थन दिलं आहे. एआयएडीएमके पक्षाचे राज्यसभा आणि लोकसभेत जवळपास 50 खासदार आहेत. त्यापैकी बहुतांश खासदार पनीरसेल्वम यांच्या गोटात दाखल झाले आहेत. पनीरसेल्वम यांची तरुणांमध्ये लोकप्रियता वाढत आहे. तत्पूर्वी पनीरसेल्वम यांनी शशिकलांच्या दबावाखाली मुख्यमंत्रिपद सोडले होते. त्यावेळी शशिकलांनी पक्षांच्या आमदारांची तातडीने बैठक बोलावली. त्यानंतर शशिकला यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली गेली. मात्र दोन दिवसांनी शशिकला यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे ओ. पन्नीरसेल्वम यांनी मौन सोडून त्यांच्यावर गंभीर आरोप केले. राजीनाम्यासाठी माझ्यावर दबाव आणला, असे त्यांनी जनतेसमोर सांगितले. त्यानंतर शशिकला यांनी जयललिता यांचा विश्वासघात केला होता. शशिकला या सत्तेसाठी कट कारस्थाने रचत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी शशिकला यांच्यावर केला आहे. त्यामुळे एआयएडीएमके हा पक्ष शशिकला आणि पन्नीरसेल्वम अशा दोन गटांत विभागला गेला आहे. पक्षात कोणाचे वर्चस्व राहील हे येता काळच ठरवणार आहे.