शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पंचकुंडी कामधेनू गायत्री यज्ञाने वसूबारस उत्साहात

By admin | Updated: October 26, 2016 23:55 IST

पंचकुंडी कामधेनू गायत्री यज्ञाने वसूबारस उत्साहात

नाशिक : गो माता की जय! असे म्हणत बुधवारी (दि.२६) शहरात ठिकठिकाणी गोवत्स पूजन मोठ्या उत्साहात पार पाडले. आश्विन वद्य द्वादशी अर्थात वसूबारस यादिवशी दिवसभर उपवास करून शहरातील पांजरापोळ तसेच विविध गोशाळांमध्ये महिलांनी संध्याकाळी गर्दी करत गाय आणि वासराची पारंपरिक पद्धतीने पूजा करून गायीला नैवेद्य अर्पण केला.दीपावली सणाची सुरुवात वसूबारस या दिवसापासून होत असल्याने बुधवारी रात्री शहर परिसर पणत्या आणि आकाशकंदिलांनी उजळून निघाला होता. आकर्षक आणि नक्षीदार रांगोळ्यांनी दीपावलीचे शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. शहराची वाढ होत असताना अनेक गोठे नामशेष होऊ लागले आहेत. त्यामुळे आज शहरातील नागरिकांनी पंचवटी येथील पांजरापोळ, तिडके कॉलनी येथील गुरुगंगेश्वर वेदमंदिर आश्रम, तपोवन येथील कृषी गो-सेवा ट्रस्ट, दिंडोरी येथील नंदिनी गोशाळा तसेच परिसरातील विविध गोशाळांमध्ये जाऊन गाय आणि वासराची विधिवत पूजा केली. दिंडोरीरोड येथील नंदिनी गोशाळा येथे गोवत्स पूजनानिमित्त बेवारस गायींची काळजी घेणाऱ्या तसेच गायीची सेवा करणाऱ्या सेवकांना उज्ज्वल भविष्य लाभावे, तसेच देशभरात ठिकठिकाणी सुरू असलेली गोवंश हत्त्या थांबावी यासाठी ‘पंचकुंडी कामधेनू गायत्री यज्ञ’ करण्यात आला. यावेळी ५०० हून अधिक भाविकांनी नंदिनी गोशाळेला भेट देऊन गोवत्साची मनोभावे पूजा केली.