शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय स्वार्थासाठी पंचकुला जळू दिले, हायकोर्टाने हरयाणा सरकारला फटकारले, केंद्र सरकारवरही ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 05:56 IST

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला बलात्काराच्या प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरविल्यानंतर, त्याच्या समर्थकांनी जो धुडगूस घातला, त्याला हरयाणा सरकारच जबाबदार आहे, असे थेट ताशेरे पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने शनिवारी ओढले.

चंदीगड/पंचकुला/नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला बलात्काराच्या प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरविल्यानंतर, त्याच्या समर्थकांनी जो धुडगूस घातला, त्याला हरयाणा सरकारच जबाबदार आहे, असे थेट ताशेरे पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने शनिवारी ओढले. तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थासाठी पंचकुला शहर जळू दिले, अशा शब्दांत न्यायालयाने हरयाणा सरकारला व मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना फटकारले.डेरा सच्चा सौदाचे सिरसासह राज्यभरात जितके आश्रम आहेत, ते रिकामे करण्याबाबतची तुमची पूर्ण योजना आमच्याकडे सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने हरयाणा सरकारला दिले. बाबा राम रहीमला काल सीबीआय न्यायालयात आणण्यासाठीच्या ताफ्यात केवळ पाचच वाहने होती, अशी माहिती तुम्हाला कोणत्या अधिकाºयाने दिली? त्याचे नाव आम्हाला सांगा, असे आदेशही न्यायालयाने राज्याचे अ‍ॅडव्होकेट जनरल महाजन यांना दिले आहेत.हरयाणा देशाचा भाग नाही का?न्यायालयात केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सत्यपाल जैन उपस्थित होते. त्यांनी कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे, असे प्रतिपादन करताच, न्यायालयाने त्यांना हरयाणा हा देशाचा भाग आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? असा थेट सवाल केला, तसेच पंतप्रधान हे भारताचे आहेत, भारतीय जनता पक्षाचे नाहीत, असेही त्यांना सुनावले.तुम्ही निर्णय अमलात येऊ दिले नाहीतप्रशासकीय व राजकीय निर्णयांमध्ये खूपच फरक होता. प्रशासनाने घेतलेले निर्णय राजकीय नेतृत्वाने अमलात येऊ दिले नाहीत, तुम्ही आमची दिशाभूल केलीत, अशी भाषा न्यायालयाने हरयाणा सरकारच्या बाबतीत वापरली. आता तुम्ही पंचकुलाच्या पोलीस उपायुक्तांना निलंबित केले आहे, पण काल जे घडले, त्याला केवळ तो अधिकारीच जबाबदार होता की काय? असा सवालही न्यायालयाने सरकारला विचारला.न्यायालयाने केला संताप व्यक्तपंचकुलामध्ये राम रहीम समर्थकांनी काल केलेली दगडफेक, जाळपोळ व हिंसाचार याबद्दल न्यायालयाने राज्य सरकारलाच जबाबदार धरले. या प्रकारानंतर पंचकुलामधील गोळीबारात २८ मरण पावले होते.या समर्थकांनी शेकडो वाहने जाळली, रेल्वे स्टेशन, बसेस, सरकारी कार्यालये, पेट्रोल पंप यांनाही आगी लावण्यात आल्या.या समर्थकांना पंचकुलाच्या बाहेर काढा, असे आदेश न्यायालयाने सरकारला दोनदा दिले होते. तरीही समर्थकांना हटविण्यात आले नाही आणि इतकी जाळपोळ झाली. त्यामुळे न्यायालयाने आपला संताप व्यक्त केला.डेराच्या सर्व मालमत्तांची यादी सादर करापंजाब व हरयाणात डेरा सच्चा सौदाच्या स्थावर व जंगम किती मालमत्ता आहेत, याची यादी आम्हाला सादर करा व पुढील सूचना मिळेपर्यंत यातील एकही मालमत्तेबाबत डेरातर्फे कोणताही व्यवहार होता कामा नये, असेही उच्च न्यायालयाने पंजाब व हरयाणा सरकारांना सांगितले आहे.थेट मुख्यमंत्र्यांवर टीकाराज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच गृहखातेही आहे. गेले सात दिवस तुम्ही इतक्या लोकांना (पंचकुलामध्ये) येऊ का दिले, असा प्रश्न विचारत, मुख्यमंत्री त्यांना संरक्षण देत आहेत, अशी टीकाच न्यायालयाने मनोहरलाल खट्टर यांच्यावर केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय