शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पान २- म्हादईप्रश्नी लवादाकडे याचिका दाखल करणार - राजेंद्र केरकर : १५ रोजीच्या सुनावणीस गोव्याची जय्यत तयारी

By admin | Updated: July 13, 2015 01:06 IST

डिचोली : म्हादईप्रश्नी १५ जुलै रोजी होणार्‍या सुनावणीसाठी गोवा सरकारने कर्नाटकशी दोन हात करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दुसर्‍या बाजूने म्हादईचा लढा जिंकण्यासाठी हरित लवादाकडे याचिका दाखल करण्याची तयारी पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी केली असून वन्यजीव व पर्यावरणीय मु्द्यावर ही लढाई लढण्याचे ठरवले आहे.

डिचोली : म्हादईप्रश्नी १५ जुलै रोजी होणार्‍या सुनावणीसाठी गोवा सरकारने कर्नाटकशी दोन हात करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. दुसर्‍या बाजूने म्हादईचा लढा जिंकण्यासाठी हरित लवादाकडे याचिका दाखल करण्याची तयारी पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी केली असून वन्यजीव व पर्यावरणीय मु्द्यावर ही लढाई लढण्याचे ठरवले आहे.
म्हादईचा लढा सफल करण्यासाठी गोवा सरकारने १५ रोजी होणार्‍या जललवादासमोरील सुनावणीसाठी सर्व प्रकारची व्यूहरचना करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. गोवा सरकारने म्हादई नदीचे पाणी अन्यत्र वळवले तर गोव्याच्या पर्यावरण व लोकजीवनावर दुष्परिणाम होणार असल्याचे मुद्दे लवादासमोर ठेवण्याचे ठरवले आहे.
त्यानुसार गोव्याचे ॲड. जनरल आत्माराम नाडकर्णी आणि वकिलांची फौज प्रयत्नशील आहे.
पुण्याचे जलविवादासंदर्भातील तज्ज्ञ म्हणून चेतन पंडित यांची नियुक्ती गोवा सरकारने यापूर्वीच केली आहे. ॲड. नाडकर्णी यांनी गोव्याची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी विविधप्रकारे सखोल अभ्यास, दस्तावेज तयार केले आहेत. कर्नाटक व महाराष्ट्राकडून म्हादईच्या उपनद्यांचे जे पाणी वळवल्यास त्याचा पहिला फटका म्हादई अभयारण्याला बसणार आहे. त्यामुळे वन्यजीव आणि पर्यावरण आदी मुद्यांवर भर देऊन राष्ट्रीय हरित लवादासमोर लवकरच याचिका दाखल करणार असल्याचे राजेंद्र केरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
बॉक्स - राज्यपालांच्या उपस्थितीत चर्चा
राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या उपस्थितीत गोवा राज्य पर्यावरण संरक्षण मंडळाच्या हल्लीच झालेल्या बैठकीत राजेंद्र केरकर यांनी म्हादईचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी त्यांनी म्हादईचा लढा राष्ट्रीय हरित लवादाकडे नेणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी याप्रश्नी सरकारचे सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची हमी दिली आहे. या पार्श्वभूमीवर हा विषय राष्ट्रीय हरित लवादाकडे नेण्यासाठी केरकर यांनी पूर्वतयारी आरंभली आहे.

फोटो ओळी-
म्हादईचा फास आवळणार्‍या कळसा कालव्याचे काम सुरूच आहे. (विशांत वझे)