पान-2 जोड बातमी.दोनापावलच्या मार्गास आंबिये यांचे नाव देणार
By admin | Updated: March 8, 2015 00:30 IST
........चौकट
पान-2 जोड बातमी.दोनापावलच्या मार्गास आंबिये यांचे नाव देणार
........चौकटआज पहिल्या सत्रात सकाळी 10 वाजता ‘संत साहित्य व वैश्वीक एकात्मता’ विषयावर परिसंवाद होईल. डॉ. केशव सद्रे यांच्या अध्यक्षतेखाली अल्ताफ हुसेन (महाराष्ट्र), सावियो हर्मन डिसोझा (गोवा), डॉ. आर. मिर्शा (गोवा) सहभागी होतील. दुसर्या सत्रात सकाळी 11.30 वाजता ‘संत परंपरा आणि सामाजिक बांधिलकी’ विषयावर अध्यक्ष गोपाळराव मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली शेख हनिफ (गोवा), अँड. रामनाथ आंबिये (महाराष्ट्र), चंद्रशेखर गावस (गोवा) सहभागी होतील. तिसर्या सत्रात पुस्तक प्रदर्शन दालनांत आंतरमहाविद्यालयीन भित्तीपत्रकांचे प्रदर्शन आणि प्रश्नमंजूषा स्पर्धा होणार आहे. तर चौथ्या सत्रात साहित्यिक विष्णू वाघ यांच्या अध्यक्षतेखाली ‘संत साहित्याची भाषा’ या विषयावर फा. मोइजीन्यु आताएद, पत्रकार सचिन परब व परेश प्रभू सहभागी होतील. समारोप सत्रात सायंकाळी 4 वाजता प्रमुख पाहुणे म्हणून सभापती राजेंद्र आर्लेकर, मुंबई येथील फा. फ्रन्सिस ब्रीटो इत्यादी उपस्थित राहणार आहेत.