शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पान १ पाकिस्तान

By admin | Updated: September 1, 2014 21:34 IST

पिाकस्तानातील पेच कायम

श्रावणात रिमझिम पडणारा पाऊस आणि वसुंधरेने ल्यालेल्या हिरव्यागार शालूमुळे निसर्गसौंदर्य अगदी बहरून गेले असते. श्रावण आणि भाद्रपद हे दोन महिने सणावारांची रेलचेल घेऊन येतात. गणेशोत्सवासोबतच गौरी गणपतीचीदेखील चाहूल लागते. अडीच दिवसांसाठी माहेरी येणार्‍या गौरी अर्थात महालक्ष्मीच्या स्वागतासाठी सर्व आतुरतेने वाट पाहत असतात. राज्यातील इतर भागांसह पश्चिम विदर्भातदेखील मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. गौराईच्या आगमनाची तयारी दोन महिने अगोदरपासूनच सुरू होते. घराघरात स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. रंगरंगोटी आणि सजावटीच्या वस्तूंनी घर सुशोभित केले जाते. गणरायाच्या आगमनानंतर चवथ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध अष्टमीला अनुराधा नक्षत्रावर महालक्ष्मीची स्थापना केली जाते. गौराईच्या आगमनाप्रीत्यर्थ एकत्र जमलेले कुटुंबातील सर्व सदस्य मिळून ज्येष्ठा, कनिष्ठा व लहान बाळाची मुहूर्तावर प्रतिष्ठापना करतात. पार्वतीपुत्र अर्थात गणपतीबाप्पालादेखील याप्रसंगी मानाचे स्थान दिले जाते.
पश्चिम विदर्भात अनेक ठिकाणी वंशपरंपरेनुसार चांदीचे किंवा पितळेचे मुखवटे लावले जातात. तर अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा शाडू मातीच्या मुखवट्यांना प्राधान्य देऊन महालक्षुम्यांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. सजावटीसाठी आकर्षक मखर व मंडप उभारला जातो. दुसर्‍या दिवशी विधिवत लक्ष्मी पूजन केलेजाते. या उत्सवाला धार्मिकतेची किनार असली तरी, अडीच दिवसांसाठी आपल्या माहेरी येणार्‍या लाडक्या मुलींच्या स्वागताची गोड संकल्पना या उत्सवात सामावलेली आहे. यानिमित्ताने का होईना, लेकी-बाळींना दोन दिवसांसाठी आपल्या माहेरी जाण्याची संधी मिळत असल्याने त्यांच्या चेहर्‍यांवर एक विलक्षण आनंद ओसंडून वाहत असतो. दुसर्‍या दिवशी भाद्रपद शुद्ध नवमीला गौरी-गणपतीच्या पूजनानंतर आप्तेष्ट व नातेवाइकांना महाप्रसाद वितरित केल्या जातो. महाप्रसादात ज्वारीची अंबिल, सोळा प्रकारच्या भाज्यांची एकत्र शिजवून केलेली भाजी, कतली, फळे, लाडू, करंज्या, पापड्या, फुलोरा अशा नानाविध पक्वान्नांचा समावेश महाप्रसादात असतो.
तिसर्‍या दिवशी भाद्रपद शुद्ध दशमीला गौरी विसर्जित केल्या जातात. सासरी जाण्याच्या कल्पनेने व्याकूळ झालेल्या भाविकांनादेखील महालक्षुम्यांच्या चेहर्‍यावर विरहाचे चित्र स्पष्ट जाणवते. नोकरी-उद्योगधंद्यांमुळे आजकाल कुणालाच एकमेकांसाठी वेळ काढण्यास सवड मिळत नाही. धावपळीच्या या जगात कामकाजानिमित्त चारी दिशांना विखुरलेल्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणणार्‍या या साणाचा निश्चितच मनोभावे आणि दिलखुलासपणे प्रत्येकाने आनंद घ्यायलाच हवा.
- ज्ञा. रा. दहापुते
-----
फोटो : महालक्ष्मीचा प्रातिनिधिक फोटो वापरावा....
-----