शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पान १- तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक लोशाली बडतर्फ

By admin | Updated: December 14, 2015 22:22 IST

पाकिस्तानी जहाजावरील आत्मघात : वादग्रस्त वक्तव्य आले अंगलट

पाकिस्तानी जहाजावरील आत्मघात : वादग्रस्त वक्तव्य आले अंगलटनवी दिल्ली: सरकारच्या भूमिकेविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी.के. लोशाली यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मासेमारीच्या मिषाने गुजरात किनारप˜ीलगत भारतीय हद्दीत स्फोटकांच्या साठ्यासह शिरलेल्या संशयास्पद पाकिस्तानी नौकेला आत्मघाती स्फोटांनंतर मिळालेल्या जलसमाधी आणि बुडाल्याप्रकरणी शासकीय भूमिकेच्या विरोधात केलेले वादग्रस्त वक्तव्य लोशाली यांना भोवले. चौकशी मंडळाने लोशाली यांना त्यांच्यावरील सर्व आरोपांबद्दल शनिवारी दोषी ठरविल्यावर बडतर्फीचा निर्णय घेण्यात आला. ही मूळ घटना यंदाच्या नववर्षदिनाच्या पहाटेची. एका पाकिस्तानी नौकेला तटरक्षकांनी थरारक पाठलागानंतर घेरल्यानंतर नौकेवरील (मच्छिमार न वाटणार्‍या) संशयितांनी आत्मघाती स्फोटांतून आग लावली असा सरकारचा दावा होता. पण लोशाली यांनी १५ फेब्रुवारीला तटरक्षक अधिकार्‍यांशी बोलताना ३१ डिसेंबरच्या रात्री मी गांधीनगरला होतो आणि स्फोट घडवून जहाज उडविण्याचे आदेश मीच दिले होते कारण आम्हाला त्यांना बिर्याणी खाऊ घालायची नव्हती,असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याने सरकार आणि तटरक्षक दल अडचणीत आले होते.-------------वरिष्ठ महानिरीक्षक स्तरावरील अधिकार्‍यांच्या एका पथकाने तीन महिने याप्रकरणाचा तपास केला. बोर्ड ऑफ इन्क्वायरीने तीन महिन्यांच्या तपासासोबत त्यांचे कोर्ट मार्शलही केले. या घटनेनंतर लोशाली यांना वायव्य क्षेत्र चीफ ऑफ स्टाफ पदावरून हटवून गांधीनगरातील क्षेत्रीय मुख्यालयात पाठविण्यात आले होते. ----------काय घडले होतेस्फोटानंतर आगीत जळालेल्या या जहाजातील चारही जण मृत्युमुखी पडले. या जहाजावर स्फोटके होती व या संशयितांना अडविण्यात आल्यानंतर त्यांनी आत्मघात केला,असा दावा सरकारतर्फे करण्यात आला होता. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी परिस्थितीजन्य पुराव्यांवरून या पाकिस्तानी जहाजाचा संशयित दहशतवाद्यांशी संबंधंाचे संकेत मिळाले असल्याचे म्हटले होते. जहाजावरील लोक दहशतवादी नव्हे तर केवळ तस्कर असल्याचा दावा फेटाळताना आणि ते पाकिस्तानी सागरी अधिकारी, लष्कर तसेच अन्य आंतरराष्ट्रीय लोकांच्या संपर्कात होते असेही त्यांनी स्पष्ट केले होते. (वृत्तसंस्था)