शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पाकला धक्का, चीन व रशियाची भारताला साथ

By admin | Updated: February 3, 2015 13:14 IST

अमेरिका - भारतामधील जवळीक वाढत असून याचे परिणाम आता रशिया आणि चीनवर दिसू लागले आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ३ - अमेरिका - भारतामधील जवळीक वाढत असून याचे परिणाम आता रशिया आणि चीनवर दिसू लागले आहे. संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात भारताने मांडलेल्या प्रस्तावाला चीन व रशियाने पाठिंबा देण्याचे संकेत देत पाकिस्तानला धक्का दिला आहे.  पाकचा जवळचा मित्र असलेल्या चीनने इस्लामाबादमधील सत्ताधा-यांच्या विरोधात जाण्याची ही पहिलीच वेळ असावी.  
१९ वर्षांपासून भारत संयुक्त राष्ट्रात दहशतवादविरोधात महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न करत आहे. दहशतवादाला आधार आणि आर्थिक पाठबळ करणा-या देशांना दंड आकारणे असा हा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मंजुर झाल्यास त्याचा पहिला फटका पाकिस्तानलाच बसणार आहे. भारतात दहशतवादी हल्ले घडवणा-यांना व या हल्ल्यांचे कट रचणा-यांना पाठबळ देणा-या पाकची संयुक्त राष्ट्रात कोंडी करण्यासाठी हा प्रस्ताव भारतासाठी महत्त्वाचा समजला जातो. सोमवारी चीनमध्ये भारत, रशिया आणि चीन यांची संयुक्त परिषद पार पडली असून यामध्ये तिन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले होते. यामध्ये रशिया व चीनने भारताच्या दहशतवादविरोधी प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र संघात पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. यातून चीनचा भारताकडे बघण्याचा बदलेला दृष्टीकोन बदलल्याचे दिसते असे जाणकारांचे म्हणणे आहे. चीनमधील शिनजिआंग या प्रांतातील दहशतवादाला परदेशी पाठबळ असल्याचा चीनचा आरोप असून शिनजिआंगमधील दहशतावादामुळे चीनने भारताला साथ देण्याची तयारी दर्शवली असावी असेही सांगितले जाते. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या या दौ-यात चीन व रशियाने भारताला आणखी महत्त्वाच्या मुद्द्यावर पाठिंबा देण्याचे मान्य केले. संयुक्त राष्ट्र, आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य (अपेक), शांघाई सहकार्य संघटनेमध्ये (एससीओ)  भारताने महत्त्वाची भूमिका निभवायला हवी यावर चीन व रशियाचे एकमत झाले.