शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला चोख उत्तर

By admin | Updated: May 24, 2017 03:30 IST

भारताच्या दोन जवानांचे शिर धडावेगळे केल्याचा बदला ९ दिवसांतच घेत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्लाबोल केला

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या दोन जवानांचे शिर धडावेगळे केल्याचा बदला ९ दिवसांतच घेत भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्लाबोल केला असून, या गोळीबारात चौक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सैन्याने याबाबतचा एक व्हिडीओही रीलीज केला आहे. केंद्र सरकारने भारतीय लष्कराच्या या कारवाईचे जोरदार समर्थन केले आहे.भारतीय जवानांनी केलेल्या हल्ल्यात रॉकेट लाँचर, अँटी टँक गाईडेड मिसाईल, स्वयंचलित ग्रेनेड लाँचर आणि बंदुका यांचा उपयोग करण्यात आला. या हल्ल्यात १५ ते २५ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असावेत, असा अंदाज आहे. नौशेरा भागातील या प्रतिहल्ल्याबाबत सैन्याने तपशील दिला नाही. नौशेरा हा भाग जम्मू येथील सीमेला लागून आहे. माहिती व संपर्क विभागाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल ए.के. नरुला यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या घुसखोरीला मदत करणाऱ्या पाकिस्तानच्या चौक्यांवर भारतीय जवानांनी हल्ला केला.हा हल्ला म्हणजे पाकिस्तानला संदेश होता की, सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीच्या प्रयत्नांना सैन्य हाणून पाडेल. संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी टिष्ट्वटद्वारे या कारवाईचे सरकार समर्थन करीत असल्याचे स्पष्ट केले. जम्मू-काश्मिरात शांतता प्रस्थापित करण्यास अशी कारवाई आवश्यक आहे. अन्य एका टिष्ट्वटमध्ये त्यांनी म्हटले की, घुसखोरीचे समर्थन करणाऱ्या नियंत्रणरेषेपलीकडील पाकिस्तानी चौक्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. २४ सेकंदांचा व्हिडीओ सैन्याने या कारवाईचा २४ सेकंदांचा व्हिडीओ जारी केला आहे. जंगलाच्या भागात एका डोलाऱ्यावर सतत केल्या जाणाऱ्या गोळीबारामुळे तो कोसळत आहे. हा व्हिडीओ नेमक्या कोणत्या भागातील आहे ते मात्र समजत नाही. घुसखोरी वाढल्याने...भारतीय लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादविरोधी मोहिमेचा भाग म्हणून नियंत्रणरेषेच्या पलीकडून घुसखोरीला मदत करणाऱ्यांवरच कारवाई करण्यात आली आहे. मेजर जनरल नरुला म्हणाले की, पाकिस्तानी सैन्य या घुसखोरांना शस्त्रास्त्रे पुरवीत आहे. हे घुसखोर नियंत्रणरेषेजवळच्या गावांना लक्ष्य करीत आहेत. बर्फ वितळण्यास सुरुवात झाल्यानंतर घुसखोरी वाढण्याची शक्यता व्यक्त करून नौगाम भागात २०-२१ मे रोजी चार अतिरेक्यांना मारल्याच्या घटनेची त्यांनी आठवण करून दिली. त्या कारवाईत भारताचे तीन जवान शहीद झाले होते.नौशेरा भागात भारताने हल्ला करीत चौक्या उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानने फेटाळला आहे. मेजर जनरल आसिफ गफूर यांनी टिष्ट्वट केले आहे की, पाकिस्तानी चौक्या नष्ट केल्याचा भारताचा दावा खोटा आहे, तसेच नियंत्रणरेषेजवळ सामान्य नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आल्याचा दावाही चुकीचा आहे.