शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाकचे सार्क संमेलन बारगळले

By admin | Updated: September 29, 2016 06:20 IST

भारतासह चार देशांनी सार्क संमेलनात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर हे संमेलनच आता बारगळल्यात जमा आहे. हे संमेलन रद्द होणार असल्याची माहिती नेपाळच्या राजकीय

नवी दिल्ली : भारतासह चार देशांनी सार्क संमेलनात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर हे संमेलनच आता बारगळल्यात जमा आहे. हे संमेलन रद्द होणार असल्याची माहिती नेपाळच्या राजकीय क्षेत्रातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयानेही तसे संकेत दिले आहेत.सार्क संमेलनाबाबत नेपाळच्या मीडियात येणाऱ्या वृत्ताला विशेष महत्त्व आहे. कारण, नेपाळ हा या आठ सदस्यीय समूहाचा वर्तमान अध्यक्ष आहे. भारताने आपला निर्णय यापूर्वीच नेपाळला कळविला आहे. या संमेलनाबाबत काही वाद असल्यास ते सोडविण्याची जबाबदारी वर्तमान अध्यक्ष म्हणून नेपाळकडे आहे; पण सद्य:परिस्थितीत असा कोणताही तोडगा दिसत नाही. काठमांडूतील या उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, यातील सदस्य देशांनी सहभागास नकार दिल्याने हे संमेलन रद्द केल्याचे स्पष्ट केले जाईल; पण याबाबतचा निर्णय मात्र नेपाळ घेणार नाही. भारतासह चार देश बांगलादेश, भूतान आणि अफगाणिस्तानने या संमेलनात सहभागी न होण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे तूर्तास ही परिस्थिती बदलता येणार नाही, असेही नेपाळच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या चारही देशांनी आपल्या निर्णयाची माहिती नेपाळला दिली आहे. उरीतील हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जागतिक स्तरावरून दबाव वाढत असल्याचे यावरून मानले जात आहे. सीमेपलीकडून अतिरेकी हल्ले होत असल्याने यात सहभागी होत नसल्याचे कारण भारताने दिले असून, अन्य तीन देशांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, सार्क संमेलन रद्द होणार असल्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार असल्याची माहिती बांगलादेशच्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे. तथापि, एखादा देश या संमेलनात सहभागी न झाल्यास हे संमेलन आपोआपच रद्द होते, असे सार्कच्या घोषणापत्रात नमूद केलेले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पाकने दिले संमेलन रद्द होण्याचे संकेत भारताने सार्क संमेलनात सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर सार्क संमेलन रद्द होण्याचे संकेत पाकिस्तानने बुधवारी दिले आहेत. विदेश विभागाचे सल्लागार सरताज अजीज म्हणाले की, सार्कच्या नियमानुसार एखादा देश जर संमेलनात सहभागी झाला नाही तर संमेलन होऊ शकत नाही.