शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून शहीद जवानांच्या मृतदेहांची विटंबना

By admin | Updated: May 1, 2017 16:04 IST

सीमारेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

 ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि. 1 - सीमारेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पाकिस्ताननं शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले.  या शहिदांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्याच्या नॉर्दर्न कमांडकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. 
 
पाकिस्तान विनाकारण ही कृती करत असून  याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. पाकिस्तानकडून कृष्णा घाटी सेक्टरमध्ये भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देत असताना यात दोन जवान शहीद झाले.  यादरम्यानच शहिदांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली.  सोमवारी सकाळी जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील कृष्ण घाटीमधील भारतीय चौक्यांवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जवान शहीद झाले.
 
दरम्यान, 27 एप्रिल रोजी काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात पंझगाम येथील लष्करी तळावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका कॅप्टनसह तीन जवान शहीद, तर पाच जण जखमी झाले. लष्कराने केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन अतिरेकी ठार झाले होते.
 
यावेळी स्थानिकांनी जमाव जमवून दगडफेक सुरू केल्याने सुरक्षा दलांच्या कारवाईत अडथळे येत होते. त्यामुळे सुरक्षा दलांना जमावावर कारवाई करावी लागली होती. यात जखमी झालेल्या एका नागरिकाचा सायंकाळी मृत्यू झाला होता. यामुळे तणावाची परिस्थिती  निर्माण झाली होती.
 
दहशतवाद्यांनी पंझगाम येथील लष्करी छावणीवर पहाटे 4 वाजता हल्ला केला. ही छावणी येथून 100 कि.मी. अंतरावर आहे. या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह तीन लष्करी जवान शहीद झाले. चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्तान घातले, असे लष्करी प्रवक्त्याने सांगितले. कॅप्टन आयुष, असे शहीद अधिकाऱ्याचे नाव आहे. उर्वरित दोन जवानांची नावे समजू शकली नाहीत. या हल्ल्यात इतर पाच जवान जखमी झाले आहेत.
 
अंद्राबी यांना अटक
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फुटीरवादी नेत्या आसिया अंद्राबी यांना गुरुवारी अटक केली. त्यांनीच खोऱ्यातील महिलांना सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यास कथितरीत्या चिथावणी दिल्याचा आरोप आहे.