शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

पाकची पोलखोल, सर्जिकल स्ट्राइक झाल्याचं PoK च्या पोलिसानेच केला खुलासा

By admin | Updated: October 5, 2016 22:03 IST

नेटवर्क 18 च्या स्टिंग ऑपरेशननं पाकिस्तानची पोलखोल केली

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 5 - भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्षवेधी कारवाई करून दहशतवाद्यांचे ७ प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करून जवळजवळ ५० दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र पाकिस्ताननं भारताकडून कुठलेही सर्जिकल स्टाइक झालं नसल्याचा कांगावा सुरु केला आहे. यावर सीएनएन न्यूज 18 च्या स्टिंग ऑपरेशननं पाकिस्तानची पोलखोल केली आहे.

पाकिस्तान आतापर्यंत सर्जिकल स्ट्राइकबाबत किती खोटं बोलतं आहे, हे त्यांच्या एका स्थानिक पोलीस अधीक्षक गुलाम अकबर यांनी उघड केलं आहे. सीएनएन न्यूज 18च्या एका प्रतिनिधीनं पाकव्याप्त मीरपूरमधल्या लीपा या चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या पोलिसाला फोनवर आयजी असल्याचे सांगून यासंबंधी सर्व माहिती जाणून घेतली आणि पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. फोनवरील पोलीस आणि प्रतिनिधीचं संभाषण पुढीलप्रमाणे...रिपोर्टर- कसा आहेस, मी आयजी मुस्ताक बोलतो आहे.गुलाम- सर देवाच्या कृपेनं मी ठीक आहे. रिपोर्टर- तिकडे काय सुरू आहे, खूप गरमी असेल ना?गुलाम- हो सर, मात्र सीमेवर काही चांगलं घडत नाही आहे.रिपोर्टर- तू सर्जिकल स्ट्राइकबाबत बोलत आहेस का?गुलाम- हो सर, सर्जिकल स्ट्राइकमध्ये आपले तीन सैनिक मारले गेले.रिपोर्टर- मात्र दुसरीकडे 30 ते 40 जण मारले गेल्याचा दावा केला जातोय?गुलाम- हो, ते(भारत) जास्त मारले गेल्याचा दावा करत आहेत. मात्र त्या रात्री भारतीय लष्कर सीमा पार करून पाकमध्ये आलं होतं, हे खरं आहे.रिपोर्टर- त्यात किती मारले गेले हे तू सांगू शकतोस का ?गुलाम- हो सर, सर्जिकल स्ट्राइकमध्ये जवळपास 12 जणांचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टर- एकाच कॅम्पमधले 12 जण मारले गेलेत का ?गुलाम- नाही सर, माझ्याकडे याबाबत थोडीशीच माहिती आहे. मात्र भारतीय लष्करानं त्यांना घेरलं होतं.रिपोर्टर- सर्जिकल स्ट्राइकमध्ये कोणत्या तळांना लक्ष्य करण्यात आलं?गुलाम- भिंबरमधल्या लीपा आणि आस्मानीमधल्या तळांवर हल्ला करण्यात आला.रिपोर्टर- मग फक्त 12 मारले गेले काय ?गुलाम- हो सर, 12 जण शहीद झाले.रिपोर्टर- त्यांना कुठे दफन केलं ?गुलाम- मृतदेह शवपेटीत टाकून त्यांचे गाववाले घेऊन गेलेरिपोर्टर- त्यांच्या नावांची तुझ्याकडे यादी आहे का ?गुलाम- हो सररिपोर्टर- मग मला माहिती देगुलाम- यादीत 5 पाकिस्तान सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी आहेत.रिपोर्टर- किती वेळ कारवाई सुरू होतीगुलाम- सर त्या रात्री जवळपास तीन ते चार तास म्हणजे पहाटे 2 वाजता, 4 वाजता आणि 5 वाजता सतत हल्ले सुरू होते. रिपोर्टर- त्या ठिकाणी किती जण होते ?गुलाम- त्याबाबत अजून माहिती समजू शकली नाहीरिपोर्टर- मात्र तू बोललास की 12 जणांचा मृत्यू झाला. गुलाम- सर ते एका ठिकाणावरचे नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणी ठार केले.रिपोर्टर- त्यात स्थानिक रहिवासी मारले गेले की जिहादी ?गुलाम- सर स्थानिक नाही, जिहादी मारले गेले.रिपोर्टर- त्यात किती जिहादी मारले गेले ?गुलाम- त्याबाबत अजून माहिती उपलब्ध होऊ शकली नाहीरिपोर्टर- आर्मी जिहादींची माहिती लपवते आहे का ?गुलाम - हो सर, आर्मी जिहादींची माहिती उघड करत नाही.रिपोर्टर- मग चार ते पाच ठिकाणी केलेल्या कारवाईत 20 मृत्युमुखी पडले, असं म्हणू शकतो का ?गुलाम- हो, किती मारले गेले हे सांगणं तसं कठीण आहे, पण ती संख्या 20च्या घरात असू शकते,रिपोर्टर- तू तुझा परिचय देऊ शकतो का ?गुलाम- हो सर, मी स्पेशल ब्राँचचा अधिकारी आहे.रिपोर्टर- तुझं पूर्ण नाव काय ?गुलाम- गुलाम अकबर.रिपोर्टर- तुझं पद कोणतं ?गुलाम- एसपी, स्पेशल ब्राँच.