शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

भगतसिंग यांना पाकिस्तानात श्रद्धांजली

By admin | Updated: March 25, 2017 00:05 IST

भारतीय स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या ८६ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी पाकिस्तानात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

लाहोर : भारतीय स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या ८६ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी पाकिस्तानात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या तिघांच्या अन्यायकारक हत्येबद्दल ब्रिटनच्या महाराणींनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी स्वयंसेवी संस्थांचे सदस्य आणि शिक्षणतज्ज्ञांनी या निमित्ताने केली.भगतसिंग मेमोरियल फाउंडेशनने लाहोरच्या फव्वारा चौकात गुरुवारी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तिन्ही स्वातंत्र्यसैनिकांना याच चौकात २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली होती. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत लोकांनी या कार्यक्रमात भाग घेतला. ब्रिटनच्या महाराणींनी शादमान चौकाचा दौरा करून, या तिघांच्या हत्येबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी उपस्थितांनी केली. या कार्यक्रमात एक ठराव संमत करण्यात आला. महाराणींनी अन्यायकारक हत्येबद्दल आर्थिक भरपाई देण्याशिवाय भारत-पाकिस्तानची, तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांची माफी मागायला हवी, असे कार्यकर्त्यांनी या ठरावात म्हटले आहे. या वेळी भगतसिंग यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनी कॅनडा आणि भारतातून दूरध्वनीवरून भाषणही केले. या कार्यक्रमाला धार्मिक कट्टरवाद्यांकडून धोका असल्यामुळे लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून शहर पोलिसांनी कार्यक्रमाला कडेकोट सुरक्षा व्यवस्था पुरविली होती. (वृत्तसंस्था)‘आम्ही शहीद भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांचे साहस आणि त्यांचे बलिदान विसरणार नाही. सिंग यांचा आवाज प्रत्येक साम्राज्यवादी सरकारविरुद्ध घुमत राहील, असे भगतसिंग फाउंडेशन पाकिस्तानचे अध्यक्ष अब्दुल्ला मलिक यांनी म्हटले. शादमान चौकाचे ‘शहीद भगतसिंग चौक’ असे नामकरण न केल्याबद्दल त्यांनी पंजाब सरकारवर टीकाही केली. भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांसारखे लोक कधीकधीच जन्मतात. त्यांचे बलिदान कायम स्मरणात राहील, असे फाउंडेशनचे अध्यक्ष इम्तियाज कुरेशी यांनी म्हटले.