शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पाकशी सामोपचार की वार?; सरकारची खलबते, मोदींची सहकाऱ्यांशी चर्चा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 06:06 IST

हरिश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : भारताच्या हवाई हद्दीत पाकिस्तानच्या लढावू विमानांनी घुसखोरी केल्याचा संदेश हाती ...

हरिश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या हवाई हद्दीत पाकिस्तानच्या लढावू विमानांनी घुसखोरी केल्याचा संदेश हाती पडताच पंतप्रधान नरेंद्र मोदीधीरगंभीर चेहऱ्याने विज्ञान भवन येथील नियोजित कार्यक्रम मध्येच सोडून कार्यालयाकडे रवाना झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या पाकिस्तानस्थित प्रशिक्षण तळावर आदल्या दिवशी भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बुधवारी घडलेल्या ताज्या घडामोडींवर तसेच पाकिस्तानच्या या दु:साहसावर पुढे कशी पावले उचलवीत, या महत्त्वाच्या मुद्यावर सुरक्षा सल्लागार अजित डोवल, भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच अन्य सुरक्षा दलाचे अधिकाऱ्यांनी मंथन केले. त्यानंतर पंतप्रधानांना ताज्या घडामोडींची माहिती देण्यात आली.

सध्याच्या परिस्थितीत मोदी सरकार विविध पर्यायांवर विचार करत आहे. पाकिस्तानच्या ताब्यातील पायलटला परत आणणे आणि पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या अझहर मसूदला भारत ताब्यात घेणे ही भारताची सध्याची प्राथमिकता आहे. भारत आता जगाकडे अशी मागणी करू शकेल की, पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणारा अझहर मसूद हा कुठे आहे हे प्रथम निश्चित करा आणि तो आमच्या ताब्यात द्या. पण, चर्चेच्या पर्यायावर मोदी सरकार तयार नसल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी सैन्यदलांना पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. हीच स्थिती राहिल्यास दोन्ही देशांतील तणाव कायम असेल.