ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. १२ - काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांची पाकिस्तानी पत्रकार मैत्रिण मेहेर तरार यांची सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलीस चौकशी करणार आहे. शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा दक्षिण दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये १७ जानेवारी २०१४ रोजी मृतदेह सापडला होता. सुनंदा यांनी पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार व थरुर यांच्या संबंधाबाबत ट्विटरवर ट्विट केल्यानंतर त्याच्या दुस-याच दिवशी त्यांचा मृतदेह आढळला होता. जर गरज पडली तर शशी थरुर यांची पुन्हा चौकशी करण्यात येईल अशी माहिती दिल्ली पोलीस आयुक्त बीएस बस्सी यांनी दिली. मेहेर यांना अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस पाठवली नसली तरी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी मेहेर यांची लवकरच चौकशी करण्यात येईल असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. दरम्यान, सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी चौकशीसाठी भारतात येणार नाही परंतू चौकशीसाठी सहकार्य करणार असल्याची माहिती मेहेर तरार यांनी दिली आहे.
सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरारची चौकशी होणार
By admin | Updated: March 12, 2015 17:43 IST