शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी अभिव्यक्तीचीही जागतिक भरारी

By admin | Updated: April 4, 2015 23:27 IST

पाकिस्तानात हल्ले, दंगली होतात. सततचे टेन्शन, मानसिक दडपण असते. पण अशा परिस्थितीमध्येही येथील तरुणांमध्ये ललित कला मूळ धरत आहेत.

संमेलनात कवयित्री सलिमा हश्मी यांचा विशेष सत्कारनम्रता फडणीस - घुमानपाकिस्तानात हल्ले, दंगली होतात. सततचे टेन्शन, मानसिक दडपण असते. पण अशा परिस्थितीमध्येही येथील तरुणांमध्ये ललित कला मूळ धरत आहेत. एका साचेबद्ध प्रवाहात न अडकता स्वतंत्र विचारातून वेगवेगळ्या माध्यमांतून ते स्वत:ला व्यक्त करत आहेत. जागतिक स्तरावर त्यांच्या आविष्कारांना दाद मिळत आहे. हे चित्र आशादायी आहे. ‘पाकिस्तानमे टॅलेंट उभर रहा है’, असे मत लाहोरच्या ज्येष्ठ कवयित्री सलिमा हश्मी यांनी व्यक्त केले. प्रसिद्ध उर्दू शायर दिवंगत फैझ अहमद फैज यांच्या लाहोर येथील कन्या सलिमा हश्मी याही संमेलनात आवर्जून सहभागी झाल्या आहेत. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. दहशतवादामुळे पाकिस्तानचे चित्र आज वेगळ्या पद्धतीने रंगविले जात आहे. मात्र, केवळ याच एका गोष्टीपुरती पाकिस्तानची ओळख सीमित व्हायला नको. वाळवंटात कमळ उमलावे त्याप्रमाणे तिथेही कला, साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रात नवीन प्रयोग होत आहेत. अभिव्यक्त कशा पद्धतीने व्हायचे हा खरेतर ज्याचा त्याचा मुद्दा आहे. संकुचित विचारसरणीमुळे अभिव्यक्तीवर घाला घालण्याची कामे होतात. जेव्हा एखाद्या लेखकावर वाईट वेळ येते, तो काळ खूप कठीण असतो. परंतु त्यातून जावे लागते. काही चांगले करायचे असल्यास त्याची किंमत मोजावी लागते. क्वचितप्रसंगी अशा घटनांमध्ये प्राणासही मुकावे लागते. राजकीय, धार्मिक हे मुद्दे खरेतर कलात्मक दृष्टिकोनातून खूपच गौण असल्याचे त्यांनी सांगितले.भारत- पाकिस्तान टेबल चर्चा घडावीभारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर एक टेबल टाकावे आणि दोन्हीकडून संवादात्मक चर्चा व्हावी. कितीही लढाया झाल्या तरी संवाद सुरू राहायला हवा. कारण कोणतीही लढाई ही संवादातूनच जिंकली जाऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हम लोगोंके दिल मे राज करते हैपाकिस्तानी कलाकारांवर भारतात येण्यास बंदी घातली जाते. त्यांचे कार्यक्रम बंद पाडले जातात, याविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, हम तो लोगोंके दिलोंपे राज करते हैं...काही लोकांच्या विरोधामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही. ‘मलाला डे’ केला साजराशिक्षणासाठी दिलेल्या लढ्यामुळे ‘पाकिस्तान की बेटी’ म्हणून गौरविलेल्या मलाला हिला नोबेल पुरस्कार मिळाला. याप्रसंगी लाहोर विद्यापीठातील प्रत्येक मुलीने तसेच काही पुरुषांनीही ‘मलाला डे’ साजरा केला. कुटुंबाची जबाबदारी मुलगीच घेऊ शकते, अशी जाणीव झाल्यामुळे मुलींनाही शिकवायची मानसिकता पाकिस्तानी कुटुंबांमध्ये निर्माण होत असल्याचे हश्मी यांनी सांगितले. महिला अत्याचारांचे प्रमाण पाकिस्तानातही इतर देशांप्रमाणेच आहे. मात्र ही एकट्या महिलेची लढाई नसून पुरुषी मानसिकता बदलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.