शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी नागरिकानं दिलं 10 भारतीयांना जीवदान

By admin | Updated: March 27, 2017 13:47 IST

पाकिस्तानी तरुणाची हत्या करण्याच्या आरोपाखाली यूएईत 10 भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती पण त्यांना आता दिलासा मिळाला आहे.

ऑनलाइन लोकमत अबूधाबी, दि. २७ - पाकिस्तानी तरुणाची हत्या करण्याच्या आरोपाखाली यूएईत 10 भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती पण त्यांना आता दिलासा मिळाला आहे. बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, हत्या झालेल्या पाक तरुणाच्या वडिलांनी पंजाबच्या त्या 10 जणांना माफ केलं आहे. 2015 मध्ये अबूधाबीमध्ये एका पाक तरुणाची हत्या केल्याप्रकरणी दहा भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2015 मध्ये पाकिस्तानी तरुण मोहमद्द फरहान याची हत्या झाली होती. त्याप्रकऱणी 10 भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मोहमद्द फरहानच्या वडिलांनी इस्लामिक कायदा शरीयतनुसार युएई कोर्टात याचिका दाखल केली. यामध्ये त्यांनी दोन्ही पक्षाचा सहमतीने प्रकरण मिटवण्याची मागणी केली. त्यामध्ये त्यांनी ब्लडमनीची मागणी केली आहे. शरीयत कायद्यानुसार एखाद्याला माफ करायचे असल्यास त्याबदल्याल पैशांची मागणी केली जाती त्यास ब्लड मनी म्हणतात. कोर्टाने त्यांच्या या याचिकेवर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.मोहमद्द फरहानच्या वडिलांनी या याचिकेत असंही म्हटलं आहे की., आता माझ्या मुलगा परत येणार नाही. या दहा जणांना फाशी झाल्यास त्यांच्या आई-वडिल आणि बायको-मुलांचं काय होईल. घरातील एकदा तरुण बाहेर देशात कामाला जातो तेव्हा त्याच्यावर घरातील कुटुंबिंयांचा खर्च अवलंबून असतो. गल्फन्यूज डॉट कॉमच्या वृत्तानुसार, मोहमद्द फरहानच्या घरच्यांना मदत म्हणून 200,000 यूएई डिरहॅम दिले जातील. हे पैसे दुबईतील भारतीय उद्योगपती एस.पी. सिंग ऑबेरॉय देणार आहेत. ऑबेरॉय एक एनजीओ चालवतात. एनजीओ मार्फत य़ुएईतील भारतीयांची मदत करतात. ज्या दाहा भारतीयांना शिक्षा माफ झाली आहे. ते सर्व भारतीय पंजाब आणि हरियानातील आहेत.