शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भारत-चीनच्या वादात पाकिस्तान खुपसतोय नाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 10:34 IST

नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणारा पाकिस्तान आता भूतान-चीन आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या डोकलाममधल्या वादात उडी घेण्याच्या प्रयत्नात आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणारा पाकिस्तान आता भूतान-चीन आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या डोकलाममधल्या वादात उडी घेण्याच्या प्रयत्नात आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतात असलेले पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी चीनचे उच्चायुक्त लू झाओहुई यांची भेट घेतली आहे. इतकंच नव्हे तर बासित लवकरच भूतानचे उच्चायुक्त वेटसॉप नमगेल यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, बासित यांनी चिनी उच्चायुक्ताशी बुधवारी चर्चा केली. आता ते लवकरच भूतानच्या उच्चायुक्तांचीही भेट घेणार आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, बासित दोन्ही देशांच्या उच्चायुक्तांशी डोकलाम वादावर चर्चा करू इच्छितात. बासित यांनी भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण केला आहे. पुढच्याच महिन्यात ते पुन्हा पाकिस्तानात जाण्याची शक्यता आहे.सिक्कीम सेक्टरमधील डोकलाम परिसरावरून जवळपास 10 हजार फूट उंचीवर भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. भारतीय सैन्याने मागे हटावे, यासाठी चीनकडून वारंवार इशारे देण्यात आले आहेत. मात्र तरीही भारतीय लष्कराचे जवान सिक्कीम सेक्टरमध्ये पाय रोवून उभे आहेत. भारतीय लष्कराच्या जवानांनी जवळपास 10 हजार फूट उंच या वादग्रस्त भागात तंबू गाडले आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान तेथून सरकणार नाही, तोपर्यंत आपणही माघार घेणार नाही, असा पवित्रा या सैनिकांनी घेतला आहे. दरम्यान, भारतीय जवानांनी या परिसरात तंबू ठोकल्यानंतर आता चीननेही येथे दीर्घकाळ उभे राहण्याच्या इराद्याने तळ ठोकला.सिक्कीमजवळील डोकलाम परिसरात भारत आणि चिनी सैन्यामध्ये निर्माण झालेला तिढा आता अधिकच वाढला आहे. चीनच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जवानांनी या परिसरात तंबू ठोकल्यानंतर आता चीननेही येथे दीर्घकाळ उभे राहण्याच्या इराद्याने तळ ठोकला आहे. या ठिकाणी दोन्हीकडचे सुमारे प्रत्येकी 300 सैनिक उपस्थित असून, दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये केवळ 120 मीटरचे अंतर आहे. असे असले तरी दोन्ही सैन्यांमध्ये झटापट होण्याची शक्यता नाही.

अधिक वाचा(बॉम्बर विमानाची सवय करुन घ्या! जपानला चीनचा इशारा)(चीनच्या धमकीला ठेंगा, भारतीय लष्कराने डोकालममध्ये गाडले तंबू)(चीनच्या धमक्या आणखी वाढल्या)

 

डोकलाम विवादावर चीनकडून सत्य लपवण्यात येत असल्याचे वृत्तही समोर आले होते. ""सिक्कीम-तिबेट 1890 करार""चे दस्ताऐवज दाखवत चीननं डोकलामसंदर्भात असा दावा आहे की, तिबेट सरकारनं यावर स्वाक्षरी केली नव्हती. 16 जूनपासून चिनी सैनिकांनी डोकलाममध्ये एका रस्ते बांधणीचं काम सुरू केले होते, ज्यानंतर या परिसरात भारत आणि चीनमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. तसे पाहायला गेले तर हा भाग भूतानमध्येही मोडतो. 1890 साली झालेला करार वगळता चीननं 1960पर्यंत भूतान-तिबेट आणि सिक्कीम-तिबेट सीमांसंदर्भात कोणत्याही करारावर सहमती दर्शवली नव्हती.