शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन

By admin | Updated: October 3, 2016 11:28 IST

पूंछमधील शहापूर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानी सैन्यांनी गेल्या आठवड्यात चौथ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे

ऑनलाइन लोकमत

जम्मू काश्मीर, दि. 3 - भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर  तरी पाकिस्तान धडा शिकेल आणि आपल्या कारवाया थांबवेल असं वाटत असतानाच पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पूंछमधील शहापूर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाकिस्तानी सैन्यांनी गेल्या आठवड्यात चौथ्यांदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. 
 
दरम्यान रात्री दहशतवाद्यांनी भारतीय लष्करावर बारामुल्लामध्ये घुसखोरी करून हल्लादेखील केला होता. दहशतवाद्यांनी राष्ट्रीय रायफलच्या 46 या कॅम्पमधून थेट सार्वजनिक पार्कमध्ये प्रवेश केला होता. भारतीय जवानांनीही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र दहशतवादी हल्ल्यात तीन जवानही जखमी झाले असून, एक जवान शहीद झाला आहे. दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेली जोरदार चकमक अखेर थांबली आहे. 
 
 
बारामुल्ला शहरापासून हा कॅम्प 54 किलोमीटर लांब आहे. येथे राष्ट्रीय रायफलच्या 46 बटालियनचे मुख्यालय आहे. याच मुख्यालयाला अतिरेक्यांनी रात्री 10.30 वाजता लक्ष्य केले. दोन अतिरेकी या ठिकाणी आत्मघाती हल्ल्याच्या मनसुब्याने आले होते. मात्र, भारतीय जवानांनी अतिरेक्यांच्या दिशेने तुफान गोळीबार केला. शिवाय धडक कृती दलाला आणि पोलिसांचे विशेष पथकही पाचारण करण्यात आले.