जम्मू : पाकिस्तानने गेल्या ४८ तासांमध्ये तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत भारताच्या १० चौक्यांवर, तसेच लहान लहान वस्त्यांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात बीएसएफच्या दोन जवानांसह चार जण जखमी झाले आहेत.पाकिस्तानी जवानांनी काल रात्री ८.३० पासून जम्मूच्या अरनिया भागात गोळीबार सुरू केला. याला भारतीय जवानांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले.शस्त्रसंधीचे हे उल्लंघन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्याच्या लेह व कारगील दौऱ्याआधी झाले आहे. येथील विद्युत प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान येत असून ते यावेळी सैनिकांसोबत संवाद साधणार आहेत.
पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
By admin | Updated: August 12, 2014 02:15 IST