शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने शब्द फिरवत शांतता चर्चा थांबवली

By admin | Updated: April 8, 2016 09:57 IST

पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतीय अधिका-यांना पाकिस्तानात येऊन पुरावे गोळा करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही असं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सांगितलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ८ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतीय अधिका-यांना पाकिस्तानात येऊन पुरावे गोळा करण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही असं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानचं तपास पथक भारतात येऊन तपास करुन गेले असताना पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी हे वक्तव्य केलं आहे. याअगोदरही पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) कोलांटी उडी मारत पठाणकोट हल्ला म्हणजे पाकला बदनाम करण्यासाठी भारतानेच रचलेले नाटक होते असा आरोप केला होता.
 
पाकिस्तानी तपास पथकाचा दौरा ही देवाण घेवाण नव्हती असं अब्दुल बसित  बोलले आहेत. तसंच भारतासोबत सुरु असलेली शांतता चर्चादेखील रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानने आपला शब्द फिरवल्यामुळे केंद्र सरकार कोंडीत सापडण्याची शक्यता असून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानचं तपास पथक भारतात येईल आणि त्या बदल्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अधिकारी पाकिस्तानात जाऊन तपास करतील असं ठरल होतं अशी माहिती सरकारने दिली आहे. 
 
पाकिस्तानने घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांची भुमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. परराष्ट्र सचिवांशी यासंदर्भात चर्चा होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. पठाणकोट दहशतवाही हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताने दिलेल्या पुराव्यांच्या आधारे जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा सहभाग आहे की नाही याची चौकशी करण्यासाठी विशेष पथक नेमलं होतं.