शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाकने अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करावीत

By admin | Updated: January 25, 2016 01:58 IST

पाकिस्तान देशातील अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करू शकतो आणि ते त्यांनी करावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले

वॉशिंग्टन : पाकिस्तान देशातील अतिरेक्यांची पाळेमुळे नष्ट करू शकतो आणि ते त्यांनी करावे, असे आवाहन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले. भारतातील वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पाकिस्तान दौऱ्याचे ओबामा यांनी कौतुक केले, तर पठाणकोट हल्ला म्हणजे भारत अनेक वर्षांपासून सहन करीत असलेल्या अतिरेकी कारवायांचाच एक भाग असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भारत-अमेरिका संबंध, वाढता दहशतवाद, पॅरिस जलवायू शिखर संमेलनाचे फायदे अशा अनेक विषयावर ओबामा यांनी आपले मत व्यक्त केले. भारत आणि पाकिस्तानचे नेते चर्चेची तयारी करीत आहेत. तथापि, दहशतवादाचा मुकाबला कसा करावा यावर विचार करीत आहेत. भारत आणि अमेरिका संबंधही निर्णायक टप्प्यावर असल्याचे सांगत ओबामा म्हणाले की, मजबूत संबंधांसाठी मोदी यांनी घेतलेला पुढाकार उत्साह दर्शविणारा आहे. २०१४ मधील पेशावरच्या शाळेवरील हल्ल्यानंतर शरीफ यांनी अतिरेक्यांना लक्ष्य करण्याचा संकल्प केला होता, याची आठवण ओबामा यांनी करून दिली. तर या घटनेनंतर पाकिस्तानने अनेक अतिरेकी संघटनांवर कारवाई केल्याचेही ते म्हणाले.