शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, 7 जणांचा मृत्यू

By admin | Updated: November 1, 2016 14:45 IST

पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही कायम असून मंगळवर पहाटेपासूनच सीमेपलीकडून सतत गोळीबार होत आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 1 -  गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात सात नागरिकांना मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन मुले आणि चार महिलांचा समावेश आहे.  पाकिस्तानकडून सांबा आणि राजौरी सेक्टरमध्ये तुफान गोळीबार सुरू आहे. 
 
रेशब (वर्ष 5),  अभी (वर्ष 5) आणि रवींदर कौर (19 वर्ष) अशी काही मृतांची नावं समोर आली आहेत. पाकिस्तानकडून रामगडमध्ये करण्यात आलेल्या उखळी तोफांच्या हल्ल्यात  रवींदर कौर या तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर अरनियामधील गोळीबारात तीन भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. 
 
 
(पाकच्या गोळीबारात एक महिला जखमी)
 
 पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर येथील रामगड येथील नागरिकांना आणि लष्करी अधिका-यांना निशाणा बनवला जात आहे, अशी माहिती एका अधिका-याने दिली आहे.  
 
मंगळवारी पहाटे 5 पासून पाकिस्तानने पुन्हा गोळीबार सुरू केला असून काश्मीरमधील आर.एस. पुरा जिल्ह्यातील अरनिया सेक्टरमधील गोळीबारात 2 नागरिक जखमी झाले होते. 
 
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानकडून आतापर्यंत 60 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. दरम्यान, भारतीय जवान पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत.