शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

भारतीय चौक्या उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानचा "तो" व्हिडीओ बनावट

By admin | Updated: May 24, 2017 21:57 IST

गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढत आहेत

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - गेल्या काही दिवसांपासून सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढत आहेत. भारतीय जवानांच्या शिरच्छेदाचेही अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे भारतीय लष्कर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची भाषा करत होते. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय जवानांनी नौशेरातील पाकिस्तानच्या हद्दीतील चौक्या नेस्तनाबूत केल्या होत्या. त्याचा एक व्हिडीओही व्हायरल केला होता. मात्र भारतानं पाकव्याप्त काश्मीरमधल्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराने फेटाळला होता. त्यानंतर पाकिस्ताननंही भारताच्या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. मात्र पाकिस्ताननं दिलेला हा व्हिडीओ बनावट असल्याचं आता सिद्ध झालं आहे. पाकिस्तानचा हा खोटारडेपणा भारतीय लष्कराने उघड करत पाकिस्तानला तोंडघाशी पाडलं आहे. पाकिस्तानकडून जारी करण्यात आलेला तो व्हिडीओ बनावट असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. राजौरी सेक्टरमधील नौशेरातील भारतीय चौक्या उडवल्याचा पाकिस्ताननं केलेला दावा भारतानं खोडून काढला आहे. भारतीय चौक्यांना उडवणे शक्य नसल्याचं भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं आहे. भारतीय चौक्यांच्या संरक्षक भिंती खूपच मजबूत आहेत. त्या भिंती नेस्तनाबूत करणं जवळजवळ अशक्य आहे. आयईडी स्फोटांच्या माध्यमातूनच भारतीय चौक्या उडवणं शक्य आहे.  हा व्हिडीओत ब-याच ठिकाणी एडिट केल्याचं पाहायला मिळतं आहे. पाकिस्तानने जारी केलेल्या या व्हिडिओत चौक्यांची संरक्षक भिंत कोसळल्याची पाहायला मिळते आहे. या 1 मिनिट 28 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये धूर आणि धुळीचे लोळ सर्वत्र दिसत आहेत. भारतीय लष्कराने राजौरीतील नौशेरा सेक्टरमधील पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या उडवल्यापासून पाकिस्तान बिथरला आहे. भारताच्या या जबरदस्त कारवाईमुळे भडकलेल्या पाकने सियाचीनमधून लढाऊ विमानाचे उड्डाण केल्याचा दावा केला होता. मात्र, भारतीय हवाई दलाने पाकचा हा दावा फेटाळला असून, भारतीय हद्दीतून अशा कोणत्याही लढाऊ विमानाचे उड्डाण झाले नसल्याचे हवाई दलाने स्पष्ट केले आहे.