शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

सीमेवर पाकचा रात्रभर गोळीबार

By admin | Updated: January 2, 2015 02:18 IST

५० ते ६० अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत असून त्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाक सीमेवर गोळीबार करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

जम्मू : पाकिस्तानने गुरुवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करीत सांबा सेक्टरमधील भारताच्या १३ सीमा चौक्यांवर तुफान गोळीबार केला़ सीमेपलीकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत भारत पाकिस्तानकडे तीव्र आक्षेप नोंदवणार आहे़ ५० ते ६० अतिरेकी भारतात घुसण्याच्या तयारीत असून त्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाक सीमेवर गोळीबार करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.बुधवारी पाकिस्तानच्या मुजोरीला भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ठोस प्रत्युत्तर देत चार पाकिस्तानी रेंजरला ठार मारले होते़ भारतीय जवानांनी गोळीबार थांबवावा, यासाठी पाकिस्तानी सैन्याला पांढरे निशाण फडकवावे लागले होते़ भारताचाही जवान या गोळीबारात शहीद झाला होता़ गेल्या तीन दिवसांत पाकिस्तानने तिसऱ्यांदा आणि आठवडाभरात सातव्यांदा शस्त्रसंधी उल्लंघन केले आहे़सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राकेश शर्मा यांनी यासंदर्भात पत्रकारांना सांगितले की, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवर नियमभंग केला आहे़ आम्ही शस्त्रसंधी भंगाबाबत पाकिस्तानकडे कठोर विरोध नोंदवू़ पाकिस्तानी रेंजरनी रात्रभर सांबा सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला़भारतीय जवानांनीही प्रत्युत्तर दिले़ सकाळी ६ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी हा गोळीबार सुरू होता़ या गोळीबारात प्राणहानी झाली नाही़ सुमारे ५० ते ६० अतिरेकी पाकिस्तानातून भारतीय सीमेत घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले़दरम्यान, पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन थांबवायला हवे़ दोन्ही देशाचे अधिकारी या मुद्यासंदर्भात संपर्कात आहेत. सीमेवरील स्थिती लवकरच सामान्य होईल, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह गुरुवारी म्हणाले़ (वृत्तसंस्था)शहीद साथी... आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी सैनिकांनी बुधवारी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे जवान राम गवारिया हे हुतात्मा झाले. त्यांच्या मृतदेहावर जम्मूतील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयात गुरुवारी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याने पुष्पचक्र अर्पण केले. च्जम्मू : आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत पाकिस्तानवर स्वत:हून कधी गोळीबार करीत नाही मात्र पाककडून असा गोळीबार होत असेल तर त्या देशानेही जशास तशा उत्तरासाठी तयार राहावे असा इशारा सीमा सुरक्षा दलाचे जम्मू फ्रंटियरचे (बीएसएफ) महासंचालक राकेश शर्मा यांनी येथे दिला आहे. च्जर पाकिस्तानी रेंजर्सनी आमच्यावर गोळीबार केला तर अम्हीही त्याला प्रत्युत्तर देऊ. पाकने बुधवारी आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत बीएसएफच्या गस्त पथकावर गोळीबार केला होता. त्यात कॉन्स्टेबल राम गवारिया हे शहीद झाले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत शर्मा बोलत होते.