श्रीनगर : देशभर स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करीत भारतातील पूँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेनजीक असलेल्या लष्करी चौक्या आणि नागरी भागात हल्ला केला.या हल्ल्यात पाच भारतीय नागरिक ठार, तर पाच जण जखमी झाले. ठार झालेल्यांमध्ये एका सरपंचाचा तर जखमींमध्ये एका लहान बाळाचा समावेश आहे. भारताकडून या हल्ल्याला चोख प्रत्यत्युत्तर देण्यात आले. (वृत्तसंस्था) शुभेच्छा अन् कुरापत... एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मोदी यांना भारताच्या स्वातंत्र्यदिनाबद्दल शुभेच्छा दिल्या. शांतता प्रस्थापित करणे दोन्ही देशांच्या दृष्टीने हिताचे असल्याचे त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.बैठकीत पडसाद ? पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीसमवेत २३ आॅगस्ट रोजी दिल्लीत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीवर शस्त्रसंधीचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. २००३ साली झालेल्या शस्त्रसंधी कराराचे आॅगस्ट महिन्यात एकूण ३२ वेळा उल्लंघन करण्यात आले, तर गेले सात दिवस सतत पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे.
पाकचा गोळीबार; पाच भारतीयांचा मृत्यू
By admin | Updated: August 16, 2015 02:47 IST