लेह : सीमेपलीकडून घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी प्रथमच बोचरी टीका केली. पाकिस्तान समोरोसमोर लढण्याची ताकद गमावून बसला आहे. म्हणूनच छुप्या दहशतवादाचा आधार घेत सीमेपलीकडून भ्याड हल्ले सुरू आहेत, असे मोदी म्हणाले.स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी त्यांनी लेह आणि लडाख युद्धभूमीलाही भेट दिली. लेह - लडाखच्या आपल्या पहिल्या दौऱ्यादरम्यान लष्कर आणि भारतीय हवाई दलाच्या जवानांना संबोधित करताना त्यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले. पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. सोबतच ‘भारतीय जवानांनो, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी आहे’ असे भावनिक भाष्य करीत त्यांनी लष्कराचे मनोधैर्य वाढविण्याचेही प्रयत्न केले.
समोरासमोर लढण्याची हिंमत पाकमध्ये नाही
By admin | Updated: August 13, 2014 03:36 IST