शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

पाकिस्तानशी लष्कर तर चीनसोबत भिडणार व्यापारी !

By admin | Updated: October 4, 2016 22:22 IST

ब्रम्हपुत्रा नदीचं पाणी अडवून आणि जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यामध्ये आडकाठी घालून चीनने पाकिस्तानची पाठराखण करणे सुरूच ठेवले

ऑनलाइन लोकमत

रेवाडी, दि. 4 - ब्रम्हपुत्रा नदीचं पाणी अडवून आणि जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यामध्ये आडकाठी घालून चीनने पाकिस्तानची पाठराखण करणे सुरूच ठेवले आहे. मात्र, आता चीनला धडा शिकवण्यासाठी भारतातील व्यापारी सज्ज झाले आहेत.

हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील विविध व्यापारी संघटनांनी यापुढे चीनचे कोणतेही सामान, वस्तू जिल्ह्यात विकणार नाही असा ठराव संमत केला आहे. आता केवळ सोशल मिडीयावरच चीनचा विरोध करणार नाही तर त्यांच्या सामानावर बहिष्कार टाकून चीनची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा आमचा प्रयत्न असेल असं व्यापारी म्हणाले. 'अमर उजाला'च्या वृत्तानुसार हरियाणामध्ये सोमवारी चीनच्या वस्तूंची या व्यापा-यांनी होळी केली.   
 
चीन पाकिस्तानला मदत करत आहे, त्यामुळे चीनच्या सामानावर बहिष्कार टाकणं गरजेचं आहे असं इथल्या व्यापा-यांनी म्हटलं आहे. या  एकाच जिल्ह्याच्या बहिष्कारामुळे चीनचे जवळपास 450 कोटींचे नुकसान होणार आहे. चीनच्या वस्तू विकल्याने फायदा जास्त होत असला तरी देशहितासाठी हा निर्णय घेतला असल्याचे व्यापारी म्हणाले. दिवाळीमध्ये विकल्या जाणा-या सामानांमध्ये 50 टक्के सामान हे चीनचे असते, फटाकेदेखील चीनी असतात. मात्र, आता रेवाडीच्या व्यापा-यांनी घेतलेल्या निर्णयाचा चीनला फटका बसणार आहे. 
चीनच्या सामानांवर बहिष्कार टाकूनच हे व्यापारी थांबले नाहीत, चीन विरोधात सोशल मिडीयावरदेखील त्यांनी मोहिम उघडली आहे. स्वदेशी सामान खरेदी करण्याचा पंतप्रधान मोदींचा भावूक मेसेज, चायनीज सामान न घेण्याची शपथ आदी मेसेज फेसबुक व्हॉट्स अॅपवर व्हायरल होत आहेत. 
 
पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था ढासळवण्यासाठी देशवासियांना चीननिर्मित वस्तू खरेदी करू नये असे आवाहन इथल्या व्यापा-यांनी  केलं आहे.