शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानी विमानांच्या भारतीय सीमेवर घिरट्या

By admin | Updated: May 25, 2017 06:34 IST

दहशतवाद्यांच्या काश्मिरातील घुसखोरीला मदत करणाऱ्या पाकिस्तानच्या चौक्यांवर भारतीय लष्कराने हल्ले केल्यानंतर पाकिस्तानात खळबळ माजली असून

इस्लामाबाद : दहशतवाद्यांच्या काश्मिरातील घुसखोरीला मदत करणाऱ्या पाकिस्तानच्या चौक्यांवर भारतीय लष्कराने हल्ले केल्यानंतर पाकिस्तानात खळबळ माजली असून, आम्हीही १३ मे रोजी भारतीय चौक्यांवर हल्ले केले होते, असा दावा करणारा व्हिडीओ पाकिस्तानने मंगळवारी रात्री जारी केला. तो अर्थातच, बोगस असल्याचे लगेच सिद्ध झाले. त्यानंतर, पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतीय सीमेपाशी घिरट्या घातल्या. एवढेच नव्हे, तर कोणत्याही राष्ट्राने आमच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्या चार पिढ्य़ांना अद्दल घडेल, अशी कारवाई आम्ही करू, असा इशारा पाकिस्तानच्या हवाई दलप्रमुखांनी केला.पाकच्या लढाऊ विमानांनी भारतीय सीमेपाशी घिरट्या घातल्या असल्या, तरी तो भाग त्या देशाचा आहे आणि भारतीय हद्दीचे त्यामुळे उल्लंघन झालेले नाही, असा दावा भारतीय हवाई दलाने केला. भारतीय चौक्यावर हल्ले केले होते, असा दावा करीत पाकने एक व्हिडीओ जारी केला. मात्र, तो बोगस असल्याचे उघड झाले.संबंध बिघडण्याची शक्यताभारतीय लष्कराने पाक चौक्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे पाडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा विचार भारत करत आहे, अशी माहिती संरक्षण गुप्तचर विभागाचे संचालक ले. जनरल विन्सेंट स्टिवॉर्ट यांनी दिली. भारतीय लष्कराने पाक चौक्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे पाडून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचा विचार भारत करत आहे, अशी माहिती संरक्षण गुप्तचर विभागाचे संचालक ले. जनरल विन्सेंट स्टिवॉर्ट यांनी दिली. पाकिस्तानचे अण्वस्त्र भंडार सातत्याने वाढत असल्यामुळे अमेरिकेला काळजी आहे, असे नमूद करतानाच पाकच्या कारवायांमुळे दोन देशांतील संबंध या वर्षात अधिक बिघडण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. पाकिस्तानच्या मदतीत कपात वॉशिंग्टन : आर्थिक वर्ष २०१८साठी पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या विदेशी सैन्य निधीत कपात करून, ही मदत २५.५ कोटी अमेरिकी डॉलरवरून १० कोटी अमेरिकी डॉलर करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. शिवाय अनुदानाऐवजी कर्ज म्हणून ही रक्कम द्यावी, असा विचार अमेरिका करीत आहे.धडा शिकविण्याची केली भाषापाकच्या लढाऊ विमानांनी सियाचीन ग्लेशियरजवळ आज सकाळी उड्डाण केल्याचे वृत्त तेथील टीव्हीने दिले. या वृत्तात पाक हवाई दलाचे सर्व तळ सक्रिय करण्यात आल्याचे म्हटले आहे.पाकिस्तान हवाई दलाचे एअर चिफ मार्शल सोहेल अमान यांनी स्कार्डूतील सीमावर्ती तळाला बुधवारी भेट दिली. या वेळी मिराज विमान चालवत त्यांनी ते भारतीय हद्दीतून नेले, असा दावा या वृत्तात होता. भारताने तो फेटाळून लावला. सोहेल अमान यांनी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना आम्ही असा धडा शिकवू की, त्यांच्या अनेक पिढ्या ते लक्षात ठेवतील, असा इशारा त्यांनी दिला.