शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:36 IST

Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशासह जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेच. उल्लेखनीय बाब म्हणजे या हल्ल्यानंतर काश्मीरमधूनही नेहमीपेक्षा वेगळीच प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी केलेल्या हल्ल्यात २६ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश जण हे भारताच्या विविध भागातील पर्यटक आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर देशासह जगभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेच. उल्लेखनीय बाब म्हणजे या हल्ल्यानंतर काश्मीरमधूनही नेहमीपेक्षा वेगळीच प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

काश्मीर खोऱ्यात मागच्या काही वर्षांमध्ये झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. या हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यामधील जनता दहशतवादी हल्ल्याविरोधात उघडपणे आवाज उठवताना दिसत आहे. पहलगामसह काश्मीरमधील बहुतांश भागांमधून या दहशतवादी कारवाईचा निषेध केला जात आहे. काश्मीरमधील जनता पहिल्यांदाच दहशतवादी कारवाईविरोधात उघडपणे बोलताना दिसत आहे.  एवढंच नाही तर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची या हल्ल्याविरोधात एकजूट झाली आहे. तसेच फुटीरतावादी हुर्रियतच्या गटांनीही दहशतवादी हल्ल्याविरोधात काश्मीर खोऱ्यामध्ये बंदचं आवाहन केलं आहे.

या दहशतवादी हल्ल्याविरोधात पहलगामपासून श्रीनगरपर्यंत दुकानं आणि पेट्रोल पंप बंद असल्याचे दिसत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या ३५ वर्षांमध्ये पहिल्यांदात दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीर खोऱ्यात बंदचं आवाहन केलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधून उमटलेली प्रतिक्रिया थोडी वेगळी भासत असून, त्यात काही गोष्टी पहिल्यांदाच दिसून आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे. -पहलगाम हल्ल्याविरोधात काश्मीर खोऱ्यात पुकारण्यात आलेल्या बंदला सर्वसामान्यांसह विविध राजकीय पक्ष, धार्मिक आणि व्यापारी संघटना तसेच फुटीरतावादी संघटना आणि नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे.  -धार्मिस गटांची संघटना मुत्तादिहा मजलिस उलेमा हिनेही बंदचं आवाहन केलं आहे. तर फुटीरतावादी नेते मीरवाईज उमर फारुख यांनी दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रति शोक व्यक्त केला आहे.  - पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या मदतीसाठी स्थानिकांकडून मदतीचा हात पुढे येत आहे. तसेच एरवी लवकर बंद होणारे पहलगाममधील टॅक्सी स्टँड रात्री उशिरापर्यंत सुरू होते.  -काश्मीर खोऱ्यामधील अनेक प्रमुख वृत्तपत्रांनी आपलं पहिलं पान काळ्या रंगात छापून या घटनेचा निषेध केला आहे.  

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर