शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पान 8 : प्रभाग वाढीला नगरसेवकांचा विरोध

By admin | Updated: August 8, 2015 00:23 IST

मुरगाव पालिका बैठक :

मुरगाव पालिका बैठक :
मुख्याधिकार्‍यांकडून निवेदन देण्याची सुचना;
12 कामगारांना कायम करण्याचा निर्णय
वास्को : ऑक्टोबरमध्ये होणार्‍या नगरपालिका मंडळाच्या निवडणुकीत पालिका क्षेत्रात प्रभाग वाढ करण्याच्या प्रक्रियेला मुरगाव पालिकेतील बहुतांश नगरसेवकांनी विरोध दर्शविला आह़े तसेच सरकारने प्रत्येक प्रभागात समान मतदारांची संख्या ठेवण्यात येईल, असा जो शब्द दिला होता त्याप्रमाणे या प्रभागांचे विभागीकरण झाल्याचा आरोप मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत नगरसेवकांनी केला आहे.
शुक्रवारी सकाळी या बैठकीचे आयोजन करण्यात आल़े बैठकीत प्रभाग रचनेवर गरमागरम चर्चा झाली. बैठकीच्या सुरूवातीलाच नगरसेवक सैयफुल्ला खान यांनी हा विषय उपस्थित केला. या विषयावर झालेल्या चर्चेत त्यांना मनेश आरोलकर, तारा केरकर, फिओला रेगो यांनी साथ दिली. या सर्वांनी सरकारने आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सोयीस्कर होतील असे प्रभागांचे विभाजन केले.
मुरगाव मतदार संघातील प्रभाग 1 ते प्रभाग 9 यामध्ये 2 हजार 66 ते 2 हजार 641 एवढी मतदारांची संख्या ठेवण्यात आलेली आहे. तर वास्को मतदारसंघातील प्रभाग 10 ते प्रभाग 25 मध्ये 2 हजार 30 ते 3 हजार 681 मतदार ठेवण्यात आलेले असल्याने प्रत्येक प्रभागात समान मतदार संख्या नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. सध्याच्या विरोधी नगरसेवकांच्या प्रभागात जास्त करून मतदारांची संख्या वाढविण्यात आली, असे करताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना लाभ होण्यासाठी दुसर्‍या प्रभागातील मतदार काढून या प्रभागात घातलेले आहेत, असा दावा विरोधी नगरसेवकांनी केला.
नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर देताना मुख्य अधिकार्‍यांनी या प्रकरणी आपण कोणताच निर्णय घेऊ शकत नसल्याचे सांगितल़े तसेच ज्या नगरसेवकांना या प्रभाग विभागणीस विरोध आह़े त्यांनी आपली निवेदने सादर करण्याची सूचना केली़ नगरसेवकांकडून आलेल्या सूचना आपण राज्य निवडणूक अधिकार्‍यांकडे निर्णयासाठी पाठवून देत असल्याचे सांगून हा प्रश्न तेथेच संपविला.
चौकट : परवाना शुल्कात सूट देण्यास विरोध
आजच्या बैठकीत बाडे येथे सेंट अँन्ड्यूज इन्स्टिट्युटची नवीन शालेय इमारत बांधण्यात येत आह़े या बांधकामास परवाना शुल्कात 50 टक्के सूट देण्याचा या पूर्वी घेण्यात आलेला ठराव मागे घेऊन शिक्षण खात्याने केलेल्या सूचनेप्रमाणे त्यांना याबाबतीत परवाना तसेच इतर विषयांच्या शुल्कात 100 टक्के सूट देण्यासंदर्भात ठराव घेण्याचा विषय चर्चेला आला. यावेळी उपनगराध्यक्षा तारा केरकर यांनी या प्रश्नी तीव्र विरोध केला. त्यांनी मुरगाव नगरपालिका आर्थिक टंचाईत असताना प्रत्येकाला जर परवाना शुल्क माफ केल्यास पालिकेचा कित्येक लाखांचा महसुल बुडेल असे सांगितले. या प्रश्नी पालिकेचे मुख्याधिकारी मेल्वेन वाझ यांनीही हस्तक्षेप करून परवाना शुल्कात शंभर टक्के सुट देण्यास नकार दिला.
--------------------------------
शिक्षण खात्याच्या पत्राचा निषेध
पालिकेची 10 कोटींची थकबाकी असल्याने तसेच महसुलात कोणतीच वाढ होत नसल्याने काही नगरसेवकांनी शिक्षण खात्याने सेंट अँन्ड्यूज इन्स्टिट्युटला सुट देण्याबाबत पाठविलेल्या पत्रास जोरदार निषेध केला. यावेळी काही नगरसेवकांनी शिक्षण खात्याच्या संचालकांनी सरकारकडून परवाना शुल्काची रक्कम वसुल करून ती पालिकेला द्यावी, अशी सूचना करून या विद्यालयास परवाना शुल्कात शंभर टक्के सुट न देण्याचा निर्णय घेतला.
-----------------------------------------
.. तर मच्छिमार बांधवांची उपासमारी
नगरसेविका फिओला रेगो यांनी वास्को समुद्र किनारा खाडीचा प्रश्न उपस्थित करून तुर्तास या खाडीवर मच्छिमार बांधवांचा व्यवसाय चालत असून ही खाडी एमपीटीच्या ताब्यात दिल्यास या मच्छिमार बांधवावर उपासमारीची वेळ येईल, असे सांगितल़े तसेच ही खाडी मच्छिमारांना राखीव ठेवण्याची सूचना करण्यात यावी, अशी मागणी केली़
---------------------------------
आमदारांकडून दिशाभूल
विरोधी गटातील नगरसेविका नॅनी डिसुझा यांनी आमदार कालरुस आल्मेदा यांनी विधानसभेत एमपीटी मंडळाला 2 कोटी 80 रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे, असे सांगितले. मात्र, ते असत्य असून आमदार आल्मेदा यांनी लोकांची दिशाभूल करू ने असे सांगितले. पालिकेला 2.80 कोटी रुपयांचे अनुदान केवळ मंजुर झालेले आहे. पण प्रत्यक्षात ते पालिकेच्या खात्यात जमा झालेले नाही़ यापुढे ते पालिका आपल्या कामाचा प्रस्ताव नगरपालिका संचालकांना पाठविणार आणि त्यानंतर अनुदान देण्यात येईल़ त्यामुळे या कामाला आणखी दोन महिने लागतील़ तो पर्यंत पालिकेच्या निवडणूका येतील. अशा परिस्थितीत आमदारांनी नागरिकांना दिशाभूल करणार्‍या घोषणा करू नये असे सांगितले.
------------------------------

बैठकीत पालिकेतील 12 हंगामी कामगारांना कायम करण्याचा तसेच इतर 37 हंगामी कामगारांना नंतर कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला.