पान 7 : देशभक्ती गीत स्पर्धेत ‘उत्कर्ष’ विद्यालय प्रथम
By admin | Updated: August 11, 2015 22:11 IST
रिवण : पणजीतील बालभवन संस्थेने आयोजित केलेल्या सांगे तालुकास्तरीय आंतरशालेय देशभक्ती समूहगीत स्पर्धेत रिवणच्या उत्कर्ष विद्यालयाला पहिले बक्षीस प्राप्त झाले. सांगेच्या विठ्ठल मंदिर सभागृहात ही स्पर्धा झाली. उत्कर्ष विद्यालय मुख्य स्पर्धेसाठी पात्र झाले असून उद्या, दि. 13 ऑगस्ट रोजी पणजीत होणार्या राज्य पातळीवरील स्पर्धेत हा संघ भाग घेणार आहे. या संघात सर्व विद्यार्थिनीच असून त्यांना हार्मोनियमवर सिद्धार्थ नाईक तर तबल्यावर प्रथमेश शानभाग या विद्यार्थ्यांची साथ मिळणार आहे, अशी माहिती सहाय्यक मुख्याध्यापक दीनानाथ प्रभुदेसाई यांनी दिली. (वार्ताहर)