पान 7- होंडा-पिसुर्लेत कामगारांची अल्प उपस्थिती
By admin | Updated: September 2, 2015 23:31 IST
होंडा : बंदमुळे या भागातील खासगी बसेस पूर्णपणे बंद असल्याने शहरी भागात जाणार्या कामगारांचे हाल झाले. होंडा आयडीसीमधील काही कंपन्यांचे कामकाज बंद ठेवावे लागल्याचे होंडा आयडीसी लघु उद्योजक संघटनेचे सचिव सचिन पाटील यांनी सांगितले. मात्र आज बंद असून सुद्धा होंडा-पिसुर्ले भागातील सर्व व्यवहार सुरळीत होते. मात्र कामावर येण्याची खासगी बसेस नसल्याने त्या कंपन्यात कामगाराची उपस्थिती दररोजपेक्षा कमी होती. येथील एसीजीएल कंपनीच्या दोन्ही विभागाचे रोजच्याप्रमाणे काम सुरू होते, असे अधिकारी दिलीप देसाई यांनी सांगितले.
पान 7- होंडा-पिसुर्लेत कामगारांची अल्प उपस्थिती
होंडा : बंदमुळे या भागातील खासगी बसेस पूर्णपणे बंद असल्याने शहरी भागात जाणार्या कामगारांचे हाल झाले. होंडा आयडीसीमधील काही कंपन्यांचे कामकाज बंद ठेवावे लागल्याचे होंडा आयडीसी लघु उद्योजक संघटनेचे सचिव सचिन पाटील यांनी सांगितले. मात्र आज बंद असून सुद्धा होंडा-पिसुर्ले भागातील सर्व व्यवहार सुरळीत होते. मात्र कामावर येण्याची खासगी बसेस नसल्याने त्या कंपन्यात कामगाराची उपस्थिती दररोजपेक्षा कमी होती. येथील एसीजीएल कंपनीच्या दोन्ही विभागाचे रोजच्याप्रमाणे काम सुरू होते, असे अधिकारी दिलीप देसाई यांनी सांगितले. दरम्यान पिसुर्ले आयडीसी मधील दोन कंपन्या वगळता इतर सर्व कंपन्यांचे व्यवहार सुरू होते. होंडा भागातील राष्ट्रीयकृत बॅँका सुरू होत्या. मात्र कर्मचारी संपावर गेल्याने कामकाज होऊ शकले नाही, असे बॅँक ऑफ इंडियाच्या होंडा शाखेतून समजले. फोटो : पिसुर्ले आयडीसी मधील कामकाज बंद ठेवलेली कंपनी. (छाया : भोमो मोटे)