पान 7 : म्हापसा पर्स चोरणार्या अल्पवयीन मुलींना अटक
By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST
बार्देस : म्हापसा पालिका बाजारपेठेत शुक्रवारच्या आठवडी बाजारात आलेल्या महिलांची पर्स पळवण्याचा प्रयत्न करणार्या दोघा अल्पवयीन मुलींना जागरूक नागरिकांनी रंगेहाथ पकडून म्हापसा पोलिसांच्या हवाली केले. म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापैकी एका मुलीने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास म्हापसा बाजारपेठेच्या मेन गेटवर एका महिलेची पर्स हातोहात पळविण्याचा प्रय} केला. यावेळी उपस्थित लोकांनी तिला पर्स मारताना रंगेहाथ पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. तर संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बाजारात अन्य एका मुलीने एका महिलेची पर्स हिसकावून पळ काढण्याचा प्रय} केला. या महिलेने आरडाओरडा केल्यामुळे लोकांनी मुलीला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. या दोघी मुली बेळगाव येथील असल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास म्हापसा पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)