शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पान 7 : अखिल गोवा मराठी वक्तृत्व स्पर्धा

By admin | Updated: August 13, 2015 00:51 IST

फोंडा : गोमंतक मराठी भाषा परिषदेतर्फे कै. बाळकृष्ण वामन सावर्डेकर स्मृती अखिल गोवा पातळीवर मराठी वक्तृत्व स्पर्धा उच्च माध्यमिक व माध्यमिक गटात घेतली जाणार आहे. ही स्पर्धा दि. 20 ते 28 ऑगस्ट रोजी केंद्र पातळीवर बाराही तालुक्यांत घेतली जाणार आहे. केंद्र पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी 30 ऑगस्ट रोजी आल्मेदा हायस्कूल, फोंडा येथे घेतली जाणार आहे. उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा थेट 30 ऑगस्ट रोजी थ्रीफ्ट को ऑप. सोसायटीच्या सभागृहात घेतली जाणार आहे. स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे- उच्च माध्यमिक गट- आचार्य धर्मानंद कोसंबी, डॉ. भाऊ दाजी लाड, डॉ. प्रेमानंद रामाणी, जयप्रकाश नारायण, डॉ. प्रकाश आमटे. माध्यमिक गट- स्वच्छ भारत, माझा आदर्श शिक्षक, देशी खेळांचे महत्त्व. उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयीन गट- राजकीय आणीबाणी परत येऊ शकते का,

फोंडा : गोमंतक मराठी भाषा परिषदेतर्फे कै. बाळकृष्ण वामन सावर्डेकर स्मृती अखिल गोवा पातळीवर मराठी वक्तृत्व स्पर्धा उच्च माध्यमिक व माध्यमिक गटात घेतली जाणार आहे. ही स्पर्धा दि. 20 ते 28 ऑगस्ट रोजी केंद्र पातळीवर बाराही तालुक्यांत घेतली जाणार आहे. केंद्र पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी 30 ऑगस्ट रोजी आल्मेदा हायस्कूल, फोंडा येथे घेतली जाणार आहे. उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा थेट 30 ऑगस्ट रोजी थ्रीफ्ट को ऑप. सोसायटीच्या सभागृहात घेतली जाणार आहे. स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे- उच्च माध्यमिक गट- आचार्य धर्मानंद कोसंबी, डॉ. भाऊ दाजी लाड, डॉ. प्रेमानंद रामाणी, जयप्रकाश नारायण, डॉ. प्रकाश आमटे. माध्यमिक गट- स्वच्छ भारत, माझा आदर्श शिक्षक, देशी खेळांचे महत्त्व. उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयीन गट- राजकीय आणीबाणी परत येऊ शकते का, पंतप्रधान मोदींचे अच्छे दिन, गोमंतकात कोकणी वृत्तपत्र का चालत नाही. तालुका पातळीवरील केंद्र, दिवस व वेळ पुढीलप्रमाणे-
सरकारी हायस्कूल, सदर फोंडा दि. 20 रोजी दुपारी 3 वाजता. एडीइआय ऑफिस वाळपई- दि. 21 रोजी सकाळी 10 वाजता, माता सेकंडरी हायस्कूल, बायणा वास्को -दि.24 रोजी सकाळी 10वाजता. स. प्रा. विद्यालय, डिचोली- दि. 25 रोजी दुपारी 3 वाजता. एडीईआय ऑफिस पेडणे- दि. 26 रोजी सकाळी 10 वाजता, सारस्वत विद्यालय म्हापसा- दि. 27 रोजी दुपारी 3 वाजता. मुष्टिफंड हायस्कूल पणजी- दि. 28 रोजी दुपारी 4 वाजता, कात्यायनी बाणेश्वर हायस्कूल, काणकोण -दि. 28 रोजी सकाळी 10 वाजता. अधिक माहितीसाठी अध्यक्ष मोहन कामत किंवा आयोजन प्रमुख कल्लाप्पा मनवाडकर यांच्याशी संपर्क साधावा.