पान 5 : दवर्ली खुनी हल्ला प्रकरणी एकाची साक्ष
By admin | Updated: August 20, 2015 22:10 IST
मडगाव : दवर्ली खुनी हल्ल्यात जखमी झालेला अल्ताफ नंदेहळ्ळी याचा भाऊ अस्लाम नंदेहळ्ळी याची साक्ष अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी नोंदवून घेतली. 16 फेब्रुवारी 2013 रोजी हा हल्ला झाला होता.
पान 5 : दवर्ली खुनी हल्ला प्रकरणी एकाची साक्ष
मडगाव : दवर्ली खुनी हल्ल्यात जखमी झालेला अल्ताफ नंदेहळ्ळी याचा भाऊ अस्लाम नंदेहळ्ळी याची साक्ष अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी नोंदवून घेतली. 16 फेब्रुवारी 2013 रोजी हा हल्ला झाला होता.इब्राहीम सज्जू आणि अन्य पाचजणांनी अल्ताफला जीवे मारण्याच्या हेतूने त्याच्यावर लोखंडी सळ्यांनी हल्ला चढवून त्याला जखमी केले. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने अल्ताफ आजही अंथरुणाला खिळून आहे. मामेबाहिणीचा विवाह इब्राहीम सज्जूशी झाला होता. मात्र, तो तिला दररोज मारहाण करत असे. त्यामुळे तीन वेळा मदिना मशीद समितीने त्याला वर्तन सुधारण्याची ताकीद दिली होती. मात्र, सतावणूक वाढू लागल्याने मामेबहिणीने 15 जानेवारी 2013 रोजी सज्जूशी घटस्फोट घेतला होता. त्यामुळे तो आपल्या कुटुंबावर चिडला होता, असे अस्लाम नंदेहळ्ळी याने साक्षीत सांगितले. 17 फेब्रुवारी 2013 रोजी गोमेकॉतील डॉक्टरांनी अल्ताफचे रक्ताळलेले कपडे आपल्याकडे दिले असता, आपण ते पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांच्याकडे दिले होते. कदम यांनी पंचनामा करून ते कपडे जप्त केले होते. या कपड्यांची तसेच संशयित सज्जूचीही या साक्षीदाराने न्यायालयात ओळख पटवली. (प्रतिनिधी)