पान 5 : फोंड्यात गर्भवतीची छेडछाड
By admin | Updated: September 4, 2015 23:12 IST
तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंद
पान 5 : फोंड्यात गर्भवतीची छेडछाड
तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा नोंदफोंडा : तीन महिन्यांची गरोदर असलेल्या एका विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी तिस्क-उसगाव परिसरातील विद्या नामक युवती तसेच तिचा प्रियकर बाळकृष्ण व अन्य एका अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी या गरोदर महिलेनेच तक्रार दाखल केली असून अद्याप संशयितांना अटक करण्यात आलेली नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला तिस्क-उसगाव भागात भाड्याच्या खोलीत राहाते. 30 ऑगस्ट रोजी तक्रारदार महिलेच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिने विद्याला याची कल्पना दिली. विद्याने आपला प्रियकर बाळकृष्ण याला कार घेऊन बोलावले. तसेच पीडित महिलेला डॉक्टरकडे नेताना बाळकृष्ण याने अन्य एका अज्ञात व्यक्तीला कारमध्ये बसवले. या अज्ञात व्यक्तीने आपला विनयभंग करून आपल्याला गप्प राहाण्यासाठी काही पैसे देण्याचाही प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, गरोदर महिलेच्या तक्रारीत कितपत तथ्य आहे, याचा तपास फोंडा पोलीस करत आहेत़ (प्रतिनिधी)---------------------------------------------मारहाण प्रकरणी तिघांना अटकफोंडा : ताकवाडा तिस्क उसगाव येथील स्वप्नील खानगावी (34) याला मारहाण केल्याप्रकरणी फोंडा पोलीसांनी निलेश निंगप्पा कांबळे, (वय-22), संदीप सखाराम कलघुटगी (28), रोहित शंकर पोवार (21) यांना अटक केली आहे. संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना प्रत्येकी 3 दिवसांची कोठडी देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. फोंडा पोलीस पुढील तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)