पान 5- अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी ठार
By admin | Updated: August 11, 2015 00:03 IST
वास्को : झुवारीनगर येथे एका अज्ञात वाहनचालकाने रात्री 11.30 च्या सुमारास एका पादचार्याला जोरदार धडक दिली. त्याला जखमी अवस्थेत त्याला चिखली येथील सरकारी कुटीर रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचे निधन झाले. वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात झुआरीनगर येथील गोल्डन मार्बल दुकानासमोर घडला. अज्ञात वाहनचालकाने पादचार्यास धडक दिल्यानंतर त्याला कोणतीही वैद्यकीय मदत न करता त्याने तेथून पलायन केले. या पादचार्यास 108 रुग्णवाहिकेने चिखली सरकारी रुग्णालयात नेल्यावर तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृताची ओळख पटली असून त्याचे नाव अनिल कुमार असून तो केरळचा असल्याचे समजते. वेर्णा पोलीस स्थानकाचे हवालदार सुधाकर तुकाराम जाधव यांनी तक्रार नोंदवली आहे.