पान 5 : फोंड्यात दिवसभरात पाच अपघात
By admin | Updated: September 6, 2015 23:09 IST
- बाजारातही तणाव : व्यापारी व विक्रेत्यांत राडा
पान 5 : फोंड्यात दिवसभरात पाच अपघात
- बाजारातही तणाव : व्यापारी व विक्रेत्यांत राडाफोंडा : फोंडा पोलीस स्थानक हद्दीत रविवारी दिवसभरात पाच अपघातांची नोंद झाली. सकाळपासून सुरू झालेले अपघातांचे सत्र संध्याकाळी उशिरापर्यंत सुरूच होते. पाचही अपघातांतील जखमींना उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, अपघातासंबंधी कोणताही तपशील पोलीस स्थानकात उपलब्ध नव्हता. तसेच अपघाताचा पंचनामा करणारे पोलीसही एका पाठोपाठ एक दुसर्या अपघातस्थळी गेल्यामुळे त्यांना अपघातांची नोंद पोलीस डायरीत करणे कठीण झाले. दरम्यान, रविवारी सकाळी फोंडा बाजारातील व्यापारी व फुटपाथवरील विक्रेत्यांमध्ये राडा झाला. बाजारातील व्यापार्यांनी फुटपाथवरील विक्रेत्यांचे सामान उचलून नेल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. परिस्थिती बिघडू नये यासाठी बाजारात काही वेळ पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. फुटपाथवरील विक्रेते दुपारपासून पोलीस स्थानकाबाहेर तक्रार देण्यासाठी ताटकळत होते. मात्र, फोंड्यातील बहुतांश पोलीस अपघाताच्या ठिकाणी तपासकामासाठी गेल्यामुळे तक्रार दाखल करण्यास विलंब होत असल्याचे या विक्रेत्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)