शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पान 4 : मुरगाव पालिकेची थकबाकी 10 कोटींवर

By admin | Updated: August 11, 2015 23:16 IST

प्रशासन गाफिल :

प्रशासन गाफिल :
वास्को : मुरगाव पालिकेची थकबाकी वसुलीची मोहीम पाच महिन्यांपासून थंडावलेली आह़े त्यामुळे थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून ही तब्बल 10 कोटींवर पोहचली आह़े
शहरात पालिकेच्या मालकीच्या काही इमारती असून त्यामध्ये फ्लॅटधारक व काही दुकानदारांचा समावेश आह़े पालिकाने काही वर्षांपूर्वी फ्लॅटधारकांच्या तसेच दुकानदारांच्या घरभाड्यात मोठया प्रमाणात वाढ केली होती़ मात्र, ही भाडेवाढ दुकानदारांना तसेच फ्लॅट धारकांना अमान्य होती़ त्यामुळे त्यांनी मंडळाला कित्येक वर्षांपासून भाडे दिले नव्हते.
मुरगाव नगरपालिका मंडळातर्फे निश्चित केलेला घरभाडे वाढीचा ठराव मंजुरीसाठी नगरपालिका संचालकांना पाठविण्यात आला होता़ पण हा ठराव अनेक महिन्यापासून नगरपालिका संचालनालयाच्या कार्यालयातील शीतपेटीत धूळ खात पडलेला आहे. त्यामुळे भाडेकरूनी वाढीव दराने भाडे भरण्यास नकार दिला होता़ याबाबत भाडेकरूनी येथील सत्र न्यायालयात एक याचिका दाखल केली होती़ तसेच हा निकाल भाडेकरूंच्या बाजूने लागला होता़ तरीही भाडेकरूनी जुन्या दराने तसेच नगरपालिका संचालकांची मंजुरी मिळाल्यानंतर अंमलात आलेली वाढीव दरातले भाडे भरण्यास कोणताच पुढाकार घेतला नाही़
दरम्यान, भाडेकरूकडून ही थकबाकी वसुल करण्यासाठी मंडळातील नगरसेवकांनी व मंडळातील अधिकार्‍यांनी कोणतीच ठोस पाऊले उचलली नाही. परंतु मागील वर्षी पालिकेच्या मुख्य अधिकारी पदावर जगन्नाथ बी़ भिंगी यांची नियुक्ती झाली. तेव्हा भिंगी त्यांनी थकबाकीचा विषय गांभीर्याने घेतला होता. शिवाय आर्थिक वर्षांच्या अखेरीस काही प्रमाणात लाखो रूपये नगरपालिकेच्या तिजोरीत जमा केला होता. मात्र, गेल्या मे महिन्यात त्यांची निवृत्ती झाल्यानंतर हा थकबाकीची मोहिम थंडावली. त्याचबरोबर विद्यमान पालिका मंडाळातर्फे थकबाकी वसुलीकडे पूर्तता कानाडोळा केला आहे. शिवाय थकबाकीत दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. त्यामुळे पालिकेने त्वरित कारवाई करून हालचाली न केल्यास पालिकेची आर्थिक स्थिती कोलमडू शकते. (प्रतिनिधी)

चौकट : नगरसेवक निवडणूकीच्या तयारीत..
आता नगरपालिकेच्या निवडणूकाजवळ आल्याने नगरसेवक व्यूहरचना आखण्यात व्यस्थ आहेत. तसेच पालिकेच्या प्रभागांची रचना आणि राखीवता जाहीर करण्यात आली नाही. तरीही नगरसेवकांनी स्वत: तर्कविर्तक बांधून त्यादृष्टिने पावले उचललेली आहेत. काही नगरसेवकांनी सत्ता संपुष्टात आल्याचे गृहीत धरून पालिकेत येणे बंद व कारभारात लक्ष देणे थांबविले आहे. त्यामुळे पालिकेची थकबाकी वसुल करण्याची जवाबदारी निवडून येणार्‍या मंडळाला करावे लागणार आहे.